agriculture news in marathi, When was the festival of literature distributed to Bhajni Mandals in Jalgaon district? | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्य वितरणाचा मुहूर्त कधी?
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

जळगाव : जिल्ह्यातील भजनी मंडळांना १०० टक्के अनुदानावर भजने, कीर्तन यासंबंधी आवश्‍यक वाद्य, साहित्य याबाबतचे वितरण अजूनही झालेले नाही. अनेक भजनी मंडळांच्या सदस्यांनी साहित्य मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांना साकडे घातले; परंतु त्यांची दखल घेतली नाही. यंदाही या योजनेसंबंधीची निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही. तसेच दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या रोजगार मिळावा, त्यांना वित्तीय स्राेत असावा, यासाठी वितरित केल्या जाणाऱ्या झेरॉक्‍स मशिनची योजनाही गुंडाळली आहे.

जळगाव : जिल्ह्यातील भजनी मंडळांना १०० टक्के अनुदानावर भजने, कीर्तन यासंबंधी आवश्‍यक वाद्य, साहित्य याबाबतचे वितरण अजूनही झालेले नाही. अनेक भजनी मंडळांच्या सदस्यांनी साहित्य मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांना साकडे घातले; परंतु त्यांची दखल घेतली नाही. यंदाही या योजनेसंबंधीची निविदा प्रक्रिया सुरू झालेली नाही. तसेच दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या रोजगार मिळावा, त्यांना वित्तीय स्राेत असावा, यासाठी वितरित केल्या जाणाऱ्या झेरॉक्‍स मशिनची योजनाही गुंडाळली आहे.

वारकरी सांप्रदायाला मदत, प्रोत्साहन म्हणून भजनी मंडळांना विविध साहित्य खरेदीसाठी जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे साहित्याचे वितरण केले जाते. शंभर टक्के अनुदान त्यासाठी मंजूर असते.

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून मागील वित्तीय वर्षात भजनी मंडळांना साहित्य वितरणासंबंधी ४३ लाख रुपये निधीची तरतूद केली होती. यासंबंधी साहित्य पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाने राबविली.

त्याविषयी कार्यवाही अंतिम टप्प्यात आलेली असतानाच जिल्हा परिषदेत भाजपमधील गटबाजी उफाळली. समाज कल्याण सभापती भाजपचेच असताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी या निविदा प्रक्रियेची चौकशी करा, यासंदर्भात पारदर्शक कार्यवाही होत नसल्याची शंका उपस्थित करून तसे पत्र प्रशासनाला दिले होते. महाजन हेदेखील भाजपचे आहेत. नंतर शिवसेनेनेही या निविदा प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला. ती एकतर्फी राबविली जात आहे. त्याबाबत न्यायालयात जाऊ, अशा इशारा शिवसेनेने दिला होता. यामुळे मागील वित्तीय वर्षात ही प्रक्रिया राबविता आली नाही. ४३ लाख रुपये निधी तसाच पडून आहे. दुसरे वित्तीय वर्ष (२०१८-१९) सुरू झाले आहे. या वर्षातही ही निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरवात झालेली नाही. पालख्यांमध्ये सहभागी होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या भजनी मंडळांना प्रस्थान होण्यापूर्वी तरी साहित्य मिळेल, अशी अपेक्षा अनेक मंडळांना लागून होती. त्यासाठी काही मंडळांच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेत येऊन सदस्य, पदाधिकारी यांची भेट घेतली. साहित्य लवकर मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, परंतु निविदाच राबविली गेली नाही. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडूनही ही योजना प्रभावीपणे राबविली गेली नसल्याची माहिती मिळाली.

स्वनिधीतील तीन टक्के निधी समाज कल्याण योजनांसाठी राखीव असतो. त्यातून झेरॉक्‍स मशिनसंबंधीदेखील तरतूद केली जायची. शंभर टक्के अनुदान त्यासाठी होते; परंतु डीबीटीमुळे या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने २०१७-१८ या वित्तीय वर्षात ही योजना बंद केली. आता या वित्तीय वर्षातही या योजनेसंबंधी तरतूद केलेली नसल्याचे सदस्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...