agriculture news in marathi, When will the waterfall of the water tank scheme ever be on the jetty? | Agrowon

टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी घाटमाथ्यावर मिळत नसल्याने घाटमाथ्यावरील ऊस पिकासह द्राक्ष, भाजीपाला पिके संकटात आली आहे. गेली अनेक वर्षांपासून टेंभूचे पाणी घाटमाथ्यावर देण्याच्या केवळ घोषणाच केल्या जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून केलेल्या घोषणा कधी पूर्ण करणार असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी घाटमाथ्यावर मिळत नसल्याने घाटमाथ्यावरील ऊस पिकासह द्राक्ष, भाजीपाला पिके संकटात आली आहे. गेली अनेक वर्षांपासून टेंभूचे पाणी घाटमाथ्यावर देण्याच्या केवळ घोषणाच केल्या जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून केलेल्या घोषणा कधी पूर्ण करणार असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

खानापूर तालुक्‍यातील भूड येथील टेंभूचा पाचवा टप्पा आहे. त्याठिकाणाहून खानापूर आणि तासगाव तालुक्‍याला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. खानापूर तालुक्‍यातील बलवडी (खा.) या गावाच्या शिवारात टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्यापासून पाणी येणार आहे. याठिकाणी या योजनेची पाणी येणारी पाइपलाइन याठिकाणी आली असून डावा आणि उजवा कालवा केला जाणार आहे. मात्र, त्याठिकाणी कोणतेही अद्यापही सुरू नाही.

या ठिकाणाहून पळशी, हिवरे यासह अनेक गावांना पाणी मिळणार आहे. त्यानुसार भूड येथे काम अद्यापही अपूर्ण आहे. या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय खानापूर आणि तासगाव तालुक्‍यांतील शेतीला पाणी मिळणार नाही. मात्र, हे काम पूर्ण करण्यासाठी केवळ घोषणाच केल्या जात आहेत. टेंभू उपसा सिंचन योजनेचे तासगाव तालुक्‍यातील लाभक्षेत्रात मिळतच नाही. त्यामुळे केलेल्या घोषणा कधी पूर्ण करणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

अग्रणी नदी बारमाही करणे आश्‍वासनच
नदी बारमाही करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. गेली दोन वर्षांपासून ना सर्व्हे, ना अंदाजपत्रक याबाबत कोणतीच हालचाल नाही.

आश्‍वासनांची खैरात सुरू
येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुन्हा घोषणांची खैरात सुरू केली आहे. सध्या भूड येथे खानापूर घाटमाथ्यावर पाणी देण्यासाठी पाइप आणल्या आहेत. कामाला गती देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मताचे राजकारण करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याची कुजबूज शेतकऱ्यांच्यात सुरू आहे.

इतर अॅग्रो विशेष
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...
अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...
अमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...