agriculture news in marathi, Where did the four-year CropSap 'PF' money went ? | Agrowon

`क्रॉपसॅप`मधील चार वर्षांच्या 'पीएफ' रकमा गेल्या कुठे?
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

पुणे : राज्यातील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अर्थात क्रॉपसॅपमधील कीडसर्वेक्षकांना भविष्य निर्वाह निधीच्या रकमा चार वर्षांपासून मिळालेल्या नाहीत. या प्रकरणी खात्यांची तपासणी करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

राज्यात क्रॉपसॅप प्रकल्प ठेकेदारांकडून चालविला जातो. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या रकमा दिल्या जातात. या प्रकल्पात सर्वेक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. ठेकेदारांनी राज्यात बहुतेक गावांमध्ये शेतकरी कुटुंबातील बेरोजगार तरुणांना सर्वेक्षक म्हणून नेमले आहे.

पुणे : राज्यातील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अर्थात क्रॉपसॅपमधील कीडसर्वेक्षकांना भविष्य निर्वाह निधीच्या रकमा चार वर्षांपासून मिळालेल्या नाहीत. या प्रकरणी खात्यांची तपासणी करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

राज्यात क्रॉपसॅप प्रकल्प ठेकेदारांकडून चालविला जातो. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या रकमा दिल्या जातात. या प्रकल्पात सर्वेक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. ठेकेदारांनी राज्यात बहुतेक गावांमध्ये शेतकरी कुटुंबातील बेरोजगार तरुणांना सर्वेक्षक म्हणून नेमले आहे.

कीडसर्वेक्षकांच्या नावे कोट्यवधी रुपये शासनाकडून दिले जातात. मात्र, चार वर्षांपासून सर्वेक्षकांना पीएफ मिळालेला नसून या रकमा कोणाच्या ताब्यात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. १५ डिसेंबरला नागपूरला विधिमंडळावर मोर्चा काढून या समस्येकडे लक्ष वेधण्याची तयारी सर्वेक्षकांनी सुरू केली आहे.

'कृषी आयुक्तालयाने या समस्येची दखल घेतली आहे. मराठवाड्यातील कृषी सहसंचालकांना देण्यात आलेल्या एका पत्रात क्रॉपसॅप व हॉर्टसॅपमधील ठेकेदारांनी नोंदणी शुल्काच्या नावाखाली सर्वेक्षकांच्या पगारातून रकमा कापल्याचा उल्लेख आहे. तसेच, पीएफच्या रकमा देखील जमा न झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. क्रॉपसॅप सर्वेक्षक संघटनेने केलेल्या या तक्रारींची खात्री करण्याच्या सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सर्वेक्षकांच्या म्हणण्यानुसार, “ठेकेदारांनी कृषी खात्याकडून रकमा उकळल्या. मात्र, आम्हाला २०१३ पासून पीएफ दिलेला नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सर्वेक्षक उपयुक्त ठरत असताना ठेकेदारांनी आमच्याकडून क्रॉपसॅपमध्ये तीन हजार रुपये तर हॉर्टसॅपमध्ये सात हजार रुपये नोंदणी शुल्क घेतले आहे. आम्ही त्याचे पुरावे आयुक्तालयाला दिले आहेत.”

वेतन व पीएफ तपशील सादर करण्याच्या सूचना
'क्रॉपसॅप प्रकल्पात ठेकेदार संस्था आहेत म्हणून सर्व प्रकल्पच चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. प्रकल्पाची संकल्पना अतिशय उपयुक्त असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो आहे, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘२०१३ ते २०१७ या कालावधीत मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थांनी कीडरोग सर्वेक्षकांचे पगार व पीएफ रकमा संबंधित सर्वेक्षकांच्या बॅंक खात्यात जमा केल्या की नाही हे तपासून आयुक्तालयाकडे तपशील सादर करण्याच्या लेखी सूचना कृषी सहसंचालकांना देण्यात आल्या आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित...अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली...
द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहणसांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय......
पर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालनापर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार...