agriculture news in marathi, white revolution in Vidarbha | Agrowon

विदर्भात रुजणार धवलक्रांतीची बीजे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

नागपूर : दुधाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असलेल्या विदर्भात शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून धवलक्रांतीचे बीज रुजणार आहेत. याकरिता बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून, लवकरच विदर्भ डेअरी अँड फूड प्रोडक्‍टस प्रा. लिमिटेड कंपनीची स्थापना केली जाणार आहे.

नागपूर : दुधाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असलेल्या विदर्भात शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून धवलक्रांतीचे बीज रुजणार आहेत. याकरिता बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून, लवकरच विदर्भ डेअरी अँड फूड प्रोडक्‍टस प्रा. लिमिटेड कंपनीची स्थापना केली जाणार आहे.

विदर्भ कधीकाळी दुधासाठी संपन्न होता. १९८० ते १९८५ या कालावधीत एकट्या अकोला शासकीय दुग्ध योजनेचे एक ते दीड लाख लिटर दुधाचे संकलन होत होते. दुधाची आवक वाढती असल्याने काही दुग्धोत्पादक संस्थांना दूध घालण्यास नकार दिला जात होता. अतिरिक्‍त दुधावर त्या वेळी प्रक्रिया करून दूध पावडर तयार करून तिचा पुरवठा राज्यात होत होता. १९८५ नंतर मात्र ही परिस्थिती बदलली. दुग्ध योजनेतील अधिकाऱ्यांची खाबुगिरी आणि त्यातून गैरप्रकारांना देण्यात येणारे प्रोत्साहन तसेच चाऱ्याची टंचाई, पाण्यात वाढलेल्या क्षाराचे प्रमाण यामुळे दुग्धोत्पादन कमी होत दुग्ध व्यवसायाला अवकळा आली. त्यानंतर आजवर वऱ्हाड तसेच उर्वरित विदर्भातील परिस्थिती बदलू शकली नाही. ही परिस्थिती बदलावी यासाठी आता पुन्हा नव्याने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

नव्याने होणार रुजवात
चिखली, मेहकर, रिसोड, मालेगाव, वाशीम या गावांत हे शेतकरी दूध संकलनाचे काम सध्या करतात. दहा हजार लिटर दुधाचे संकलन त्यांच्यामार्फत आजच्या घडीला होते. त्यांनी एकत्रित येत विदर्भ डेअरी अँड फूड प्रोडक्‍टस प्रा. लिमिटेड कंपनीची स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील पहिली बैठक महिनाभरापूर्वी तर दुसरी बैठक गुरुवारी (ता. २३) रिसोड (जि. वाशीम) येथे झाली. या बैठकीत जालना, नगर येथील दुग्ध संकलन व प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सयंत्राचा पुरवठा करणाऱ्यांनीदेखील हजेरी लावली होती. रिसोड येथील मनोज जाधव, वाशीम येथील चामुंडा डेअरीचे गजानन वानखडे, शिरपूर येथील अभिमन्यू उलेमाले, चिखली येथील हरीशभाऊ उदासी तर चिखली येथील शंतनू पाटील यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील दुग्धोत्पादक या बैठकीत होते.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...