agriculture news in marathi, whitegrum on crops, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात उसासह अन्य पिकांवरही ‘हुमणी’चा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

हुमणीचा प्रादुर्भाव फक्त उसावरच नाही तर अन्य पिकांवर झाला आहे. त्यामुळे अन्य पिके ही वाया जाण्याची शक्‍यता आहे. पाऊस नसलेल्या भागात याचा मोठा फटका बसत आहे. सरकारने आता याबाबत गांभीर्याने घ्यायला हवे.
- हरिभाऊ खेडकर, शेतकरी, भालगाव, ता. पाथर्डी.

नगर  ः सर्वच ठिकाणी ऊसपिकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र आता केवळ उसातच नाही, तर खरिपातील अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. असे असताना हुमणी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासह अन्य बाबीत कृषी विभागाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. हुमणीवर उपाययोजना करण्याबाबतच्या मार्गदशर्न कार्यशाळा केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर जिल्ह्यासह राज्याच्या बहुतांश भागात यंदा पुरेसा पाऊस नाही. आता परतीचा पाऊस निघून गेल्याने यापुढे खात्रीशीर पावसाची शाश्वती नाही. मुळात सुरवातीपासूनच पुरेसा पाऊस नसल्याने पाणीसाठवण झालेली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. त्यामुळे मागील चार वर्षांपूर्वीच्या दुष्काळापेक्षाही यंदा गंभीर परिस्थिती निर्माण होणार असून त्याची चाहुल लागली आहे. यंदा पाऊस नसल्याने व सातत्याने जास्त काळ पावसात खंड पडल्याने उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे.

सध्या जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणात ऊस हुमणीने बाधित झाला आहे. मात्र हुमणीचा प्रादुर्भाव केवळ ऊसावरच नाही तर कांदा, सोयाबीन, तुर, भुईमूग, बाजरी या पिकांवरही झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रामुख्याने दुष्काळी भाग असलेल्या पाथर्डी, नगर, जामखेड, पारनेर, शेवगाव व नगर लागून असलेल्या आष्टी, पाटोदा, शिरूर कासार तालुक्‍यात उसाशिवाय अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव असल्याचे शेतकरी सांगतात. आधीच पाऊस नसल्याने खरिपाची पिके साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रमाणात वाया गेली आहेत. रब्बीची पेरणी रखडली आहे.

अशा परिस्थितीत अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हुमणीचा उसावर प्रादुर्भाव झाल्यानंतर साधारण दीड महिन्यापूर्वी कृषी विभागाने आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असून सर्व उपाय सांगत आहोत, असे स्पष्ट केले होते. मात्र, अजूनही अनेक गावांत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी फिरकलेच नसून कृषी विभागाचे हुमणीबाबतचे मार्गदर्शन केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे उसाशिवाय अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याची कृषी विभागाला माहिती नाही.

नेमके किती क्षेत्र बाधित
नगर जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. यंदा पाऊस नसल्याने उसाची लागवड फारशी झालेली नाही. मात्र उसासह अन्य पिकांचे नेमके किती क्षेत्र हुमणीमुळे बाधित झाले याचा आकडा कृषी विभागाकडे नाही. हुमणीने बाधित झालेल्या उसासह अन्य पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...