agriculture news in marathi, whitegrum on crops, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

सातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या किडीचा ऊस पिकावर सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत असून, हजारो हेक्‍टरवर क्षेत्र ‘हुमणी’च्या विळख्यात आले आहे. हवामानातील बदलामुळे ‘हुमणी''चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या किडीचा ऊस पिकावर सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत असून, हजारो हेक्‍टरवर क्षेत्र ‘हुमणी’च्या विळख्यात आले आहे. हवामानातील बदलामुळे ‘हुमणी''चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील खरिपातील भुईमूग, सोयाबीनसह ऊस पिकावर ‘हुमणी''चा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या उसावर मोठ्या प्रमाणात ‘हुमणी’चा प्रादुर्भाव असल्याने हे पीक वाळून जात आहे. नदीकाठच्या क्षेत्रावर ‘हुमणी’चा जास्त प्रादुर्भाव जाणवत आहे. अगदी आठ ते दहा फूट उंचीचा ऊस यामुळे वाळला आहे. आडसाली उसावरही हा प्रादुर्भाव झाल्याने वाढीवरही परिणाम झाला आहे. आॅक्टोबरच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव कमी झाला होती. त्यानंतर पुन्हा प्रादुर्भाव वाढला आहे. सोयाबीन पिकावरही ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्याने ऊस वाळून जात आहे. काही शेतकऱ्यांकडून वैरणीसाठी उसाची विक्री केली जात आहे. मात्र वैरण पाठवण्यास मर्यादा आहेत. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचे बॅायलर अग्निप्रदीपन झाले असले, तरी प्रत्यक्ष गाळप सुरू झालेले नाही. यामुळे साखर कारखान्यांनी लवकरात लवकर गाळप सुरू करून हुमणी बाधित उसाला प्राधान्य देऊन ऊस तोड करावी. यामुळे काही प्रमाणात का होईन नुकसान कमी होण्यास मदत होईल.

२४५५ हेक्टर ऊस क्षेत्र बाधित
ऊस पिकावर ‘हुमणी’चा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला असून, कृषी विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील २४५५ हेक्टर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून आले आहे. उसासह इतर पिकांवर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाला असल्याने नुकसान क्षेत्रात वाढ होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...