agriculture news in marathi, whitegrum on sugarcane, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर ‘हुमणी’
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाला. त्यावर उपाययोजना करण्याबाबत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. ‘हुमणी’चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार ३०७ हेक्‍टर क्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला असल्याचा प्रशासकीय अहवाल आहे.
मात्र प्रत्यक्षात ५० हजार हेक्‍टर क्षेत्रावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव असल्याचे बोलले जात आहे. 

जिल्ह्यातील शेतकरी उसावर ‘हुमणी’चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने हतबल झाले आहेत. राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा, अकोले, नेवासा या तालुक्‍यांसह शेवगाव, पारनेरच्या काही भागांत उसाचे क्षेत्र आहे. उसावर यंदा मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिकूल हवामान, सतत ढगाळ वातावरण, पाण्याचा अति वापर अशा कारणांमुळे ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगितले जात आहे.

‘हुमणी’ने उसाची पांढरी मुळे खाण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे उसाचे सर्वाधिक क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला फटका बसेल, असे शेतकरी सांगतात. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र १ लाख ६७ हजार ६१६ हेक्‍टर क्षेत्र असून त्यातील सुमारे ३५ हजार ३०७ हेक्‍टर क्षेत्रावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाला असून त्यातील २३ हजार १२७ हेक्‍टर क्षेत्रावर उपाययोजना केल्या असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. असे असले तरी ‘हुमणी’ने बाधित झालेले क्षेत्र ५० हजार हेक्‍टरच्या पुढे आहे. कापसाचे पीक यंदाही धोक्‍यात असताना ‘हुमणी’च्या प्रादुर्भावाने आता ऊसही अडचणीत आला. नदीकाठच्या गावांतील ऊस क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे.

चाऱ्यासाठी उसाचा वापर
नगर जिल्ह्यातील बहुतांश भागांत पाऊस नसल्याने चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला की उसाचा चाऱ्यासाठी वापर होतो. यंदा ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी उसाची चाऱ्यासाठी विक्री करू लागले आहेत. परिणामी बाजारात अचानक उसाची आवक वाढू लागल्याने दर खाली येऊ लागले आहेत. सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत असल्याने ‘हुमणी’ने बाधित झालेल्या उसाचा चाऱ्यासाठी वापर होत आहे.

बाधित झालेले तालुका निहाय क्षेत्र (हेक्‍टर) ः नगर ः ३५, पारनेर ः ३०००, पाथर्डी ः १०४५, कर्जत ः ५५०, जामखेड ः ५८०, श्रीगोंदा ः ५०००, श्रीरामपूर ः २५३९, राहुरी ः ५५८३, नेवासा ः ४१००, शेवगाव ः ३२३५, संगमनेर ः ३८००, कोपरगाव ः १५००, राहाता ः ४०४६, अकोले ः २९४.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...