Agriculture news in marathi; Who is the deputy chairman of the Jalgaon Market Committee? | Agrowon

जळगाव बाजार समितीत उपसभापतिपदी वर्णी कुणाची?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदासाठी चौघे इच्छुक असून, कुणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागून आहे. 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदासाठी चौघे इच्छुक असून, कुणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागून आहे. 

जिल्ह्यात जळगाव बाजार समिती सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. या बाजार समितीमध्ये काही दिवसांपूर्वी सभापतिपदाची निवड झाली आहे. आता या महिन्याच्या अखेरिस उपसभापती यांची निवड होईल. त्यासंबंधी विशेष सभेचे आयोजन केले जाईल. उपसभापतिपदी भाजप व शिवसेना समर्थकाची नियुक्ती निश्‍चित मानली जात आहे. त्यात भाजप समर्थक मनोहर पाटील, प्रभाकर पवार, सुरेश पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर शिवसेना समर्थकांमधून वसंत भालेराव यांचे नाव चर्चेत आहे. भालेराव यांनी उपसभापतिपद यापूर्वीच भूषविले आहे. तर मनोहर पाटील यांनादेखील सुमारे वर्षभर उपसभापतिपदाची संधी मिळाली आहे. 

उपसभापतिपदासंबंधीच्या निवडीचे अधिकार नेत्यांकडे संचालकांनी दिले आहेत. यामुळे नेते यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. सभापती निवडीच्या वेळेस सर्व संचालक एकत्र आले होते. यामुळे आता उपसभापतिपदाची निवडदेखील बिनविरोध किंवा सर्व संचालकांच्या संमतीने होईल, असे सांगितले जात आहे. या पदासाठी इच्छुकांनी संचालकांचे समर्थन व नेत्यांची मर्जी मिळविण्यासंबंधी प्रयत्न सुरू केले असल्याचे चित्र आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अमरावती जिल्हा परिषद करणार जलजागृतीअमरावती ः रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
लिची फळपिकाच्या जातीलालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
यवतमाळ जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यायवतमाळ : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील...
दुपारची झोप मुलांना करते अधिक आनंदीजी शाळकरी मुले आठवड्यातून किमान तीन वेळा दुपारी...
सांगलीतील दुष्काळी पट्टा पावसाच्या...सांगली : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे....
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत चार-...
नातेपुते-पंढरपूर मार्गावर वाहतुकीत तीन...सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि...
पीककर्ज वाटप ७० वरून  ४५.५० टक्क्यांवर...मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजना राबवूनही...
अमरावती जिल्ह्यात ५२ लाखांच्या बियाणे...अमरावती ः खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी...
बीड जिल्ह्यातील १८ चारा छावण्यांवर...मुंबई  ः शासकीय पथकाने केलेल्या तपासणीत...
अमरावतीत बियाण्यांची जादा दराने विक्रीअमरावती  ः जिल्ह्यात एका कंपनीच्या कापूस...
वसारी येथे ‘स्वाभिमानी’ने केली दगड पेरणीवाशीम : खरीप हंगाम दारात आलेला असतानाही...
संघाच्या दूध खरेदीची मर्यादा आता वीस...वर्धा ः दूध संघाला केवळ ११ हजार लिटर खरेदीची...
वाशीममध्ये सरासरी १६.८२ टक्के पीक...वाशीम ः  जिल्ह्यात २०१९-२० या वर्षाच्या खरीप...
जळगावच्या आरोग्य अधिकाऱ्याची चौकशी करू...मुंबई ः राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत...
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा धार फाटा येथे...गोजेगाव, जि. हिंगोली : बॅंका पीक कर्ज...
वाशीम समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी सचिव...मुंबई ः  वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न...
जळगावात कोथिंबीर २५०० ते ६००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...