agriculture news in marathi, Who will be involved in the national market? | Agrowon

राष्ट्रीय बाजारावर कोणाची वर्णी लागणार?
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

पुणे ः बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानंतर, पुणे बाजार समितीवर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. अनेक इच्छुकांनी यासाठी नेत्यांची मनधरणी सुरू केली असून, सभापतिपदासाठी आमदार माधुरी मिसाळ आणि शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मात्र, ‘पार्टी विथ डिफरन्स’ असलेल्या भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद या नियमानुसार आमदारांना सभापतीची संधी मिळते, की सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे. तर विविध नियुक्त्यांमध्ये शिवसेनेला किती स्थान मिळते याकडे ही शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

पुणे ः बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयानंतर, पुणे बाजार समितीवर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. अनेक इच्छुकांनी यासाठी नेत्यांची मनधरणी सुरू केली असून, सभापतिपदासाठी आमदार माधुरी मिसाळ आणि शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मात्र, ‘पार्टी विथ डिफरन्स’ असलेल्या भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद या नियमानुसार आमदारांना सभापतीची संधी मिळते, की सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे. तर विविध नियुक्त्यांमध्ये शिवसेनेला किती स्थान मिळते याकडे ही शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

विविध पणन सुधारणांच्या अध्यादेशाला गुरुवारी (ता. २५) राज्यपालांच्या सहीने मान्यता मिळाली. यामधील महत्त्वपूर्ण असलेल्या राजकीय सुधारणेमध्ये ज्या बाजार समित्यांमध्ये एकूण आवकेच्या ३० टक्के शेतीमाल हा २ किंवा अधिक राज्यांमधून येत असेल, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, याबाजार समित्यांना निवडणुकांमधून वगळण्यात येणार असून. यावर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

पुणे बाजार समितीमध्ये हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात आदी राज्यांमधून शेतीमालाची आवक होत असते. ही आवक एकूण आवकेच्या ५० टक्क्यांपर्यंत होत असल्याने या बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बाजार समितीवर वर्णी लागण्यासाठी लोकप्रतिनिधींसह, राजकीय पदाधिकाऱ्यांनी नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. २३ जणांच्या प्रशासकीय मंडळामध्ये ५ परवानाधारक व्यापारी प्रतिनिधी असणार आहेत. यामुळे या पाच जागांसाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

शिवसेनेला सन्मानाने वाटा मिळणार?
या नियुक्त्यांमध्ये सरकारला मित्रपक्षांनादेखील संधी द्यावी लागणार आहे. यासाठी सर्वांत जवळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेचा वाटा सन्मानाने मिळणार का? अशी चर्चा सध्या बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. मागील प्रशासकीय मंडळामध्ये पुरंंदरचे शिवसेनेचे पदाधिकारी दादा घाटे यांना शेतकरी प्रतिनिधी म्हणून स्थान देण्यात आले होते. मात्र, आता व्यापारी प्रतिनिधी म्हणून शिवसेनेला किती जागा मिळतात याकडे बाजार समितीमधील शिवसेनेचेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. पाच पैकी दोन जागांसाठी शिवसेना आग्रही असल्याचे समजते. यामध्ये आंब्याचे व्यापारी करण जाधव आणि फुलांचे व्यापारी अप्पा गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपकडून गणेश घुले, राजेंद्र कोरपे चर्चेत
व्यापारी प्रतिनिधी म्हणून भाजपकडून आमदार माधुरी मिसाळ गटाचे आणि बाजार समितीचे माजी संचालक गणेश घुले आणि राजेंद्र कोरपे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. घुले यांनी लोकनियुक्त संचालक म्हणून काम केले आहे, तर कोरपे यांनी शासननियुक्त प्रशासकीय मंडळात काम केले आहे. यामुळे पाच जणांच्या यादीमध्ये या दोघांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर भुसार विभागातून भाजपशी संलग्न एकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...