'हमीभाव' कशाला हवा?, आता मार्केटिंग करा : सदाभाऊ खोत

'हमीभाव' कशाला हवा?, आता मार्केटिंग करा : सदाभाऊ खोत
'हमीभाव' कशाला हवा?, आता मार्केटिंग करा : सदाभाऊ खोत

मुंबई : ‘‘हमीभाव कशाला हवा, मार्केटिंग करा’’ असा सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयुष्यभराची उत्पादन खर्चावर रास्त भावाच्या मागणीच्या लढाईला सदाभाऊंनी भाजपच्या वळचणीला जाऊन तिलांजली दिल्याचे जुने-जाणते कार्यकर्ते बोलत आहेत. मुंबई येथे ११ व्या कृषी पर्यटन परिषदेत ते बोलत होते. मंत्री खोत यांना लढवय्या शेतकरी नेता म्हणून ओळखले जाते. खोत यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असताना केलेली आंदोलन राज्यभरात गाजत असत. त्यावरूनच सदाभाऊंना शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून गणले जात होते; मात्र आता भाजपच्या वळचणीला जाऊन सदाभाऊंनी आपलीच भूमिका बदलली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मार्केटिंग महत्त्वाचे आहे, असे सांगत हमीभाव काय मागता, मार्केटिंग करा, इस्राईलमध्ये शेतकरी हमीभाव माग नाहीत. जगाला हवे ते उत्पादित करून मार्केटिंग करतात. पतंजलीचे रामदेवबाबाही हमीभाव मागत नाहीत. त्यांची उत्पादने देशभर भन्नाट विकली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मार्केटिंगवर भर दिला पाहिजे. त्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांवर बैठक घेऊ, असे अश्वासनही सदाभाऊ खोत यांनी दिले.  कृषी पर्यटन परिषदेत एका शेतकऱ्याने बँक कर्ज देत नसून आपण बँकांना आदेश द्यावेत, अशी व्यथा मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री खोत म्हणाले, ‘‘बँकवाला ऐकत नसेल तर त्याला ''शेतकरी संघटना'' स्टाइलने समजावून सांगावे. प्रसंगी आपणच (शेतकरी) बँकांचे मालक असे समजून स्वत:च आदेश द्यावेत, मग बघू कसे कर्ज देत नाही.’’ कृषी पर्यटन धोरण अस्तित्वात असताना कृषी पर्यटन परिषदेत खोत यांनी तीन महिन्यांत कृषी पर्यटन धोरण लागू करण्याची घोषणा केली. त्यापुढे जाऊन कृषी पर्यटन परिषदेचे आयोजक पांडुरंग तावरेंना कॅबिनेट मंत्री रावळ आणि फुंडकर यांच्या उपस्थितीतच आंदोलनाचा सल्ला दिला. खोत पुढे म्हणाले, तावरे कृषी पर्यटन धोरण लागू झाले नाही, तर पुढील वर्षी कृषी पर्यटन परिषद आयोजित न करता सरकार विरोधात शेतकरी संघटना स्टाइल आंदोलन करा. मी तुमच्या सोबत असेन. एकंदरीतच नुकत्याच इस्राईल दौऱ्यावरून आलेल्या सदाभाऊंचा आवेश, भूमिका बदल पाहून व्यासपीठावरील मंत्री अधिकारी आणि उपस्थित शेतकरी मात्र अवाक झाले   होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com