agriculture news in marathi, Why not take action against Sheva Mudshi in Jalgaon district; The question of Shivsena | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील शेवया बुरशीप्रकरणी कारवाई का नाही; शिवसेनेचा सवाल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

जळगाव : जिल्हा परिषदेत शेवयांच्या प्रकरणावरून राजकारण सुरू असून, सर्वसाधारण सभेत दोषींवर फौजदारी दाखल करण्याचा ठराव होऊनही कुठलीही कार्यवाही अजून झालेली नाही. ही कारवाई न झाल्यास न्यायालयात जाऊ, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या प्रकरणावरून जिल्हा परिषदेत तणातणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

जळगाव : जिल्हा परिषदेत शेवयांच्या प्रकरणावरून राजकारण सुरू असून, सर्वसाधारण सभेत दोषींवर फौजदारी दाखल करण्याचा ठराव होऊनही कुठलीही कार्यवाही अजून झालेली नाही. ही कारवाई न झाल्यास न्यायालयात जाऊ, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या प्रकरणावरून जिल्हा परिषदेत तणातणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

 जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराअंतर्गत झालेल्या शेवयांच्या पुरवठ्यात अनेक ठिकाणी बुरशी आढळली होती. त्याबाबत प्रशासनाने पंचनामे केले होते; परंतु याबाबत पुरवठादार किंवा इतर दोषी यंत्रणांवर कोणतीही कार्यवाही होत नव्हती. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मागील आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी तक्रार केली. काही पदाधिकाऱ्यांनीदेखील हा मुद्दा मांडला. बुरशीयुक्त शेवया आरोग्याला हानिकारक आहेत. त्याबाबत प्रशासन का कारवाई करीत नाही.

दोषींना कोण वाचवित आहे, असे प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केले. झालेल्या पंचनाम्यांंच्या आधारावर दोषींवर फौजदारी कारवाईसंबंधी प्रशासन पावले उचलेल, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, अजूनही फौजदारीची कार्यवाही झालेली नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी जिल्हा परिषदेत काही पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप शिवसेनेने जाहीरपणे केला आहे. यासंदर्भात शिवसेना व भाजप यांच्यात तणातणी सुरू
असतानाच भाजपमध्येही अंतर्गत वाद उफाळण्याची शक्‍यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...