agriculture news in marathi, will grant subsidy to Jalyukt villages : Davle | Agrowon

जलयुक्त गावांना अनुदान देण्याचा विचार : डवले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

नाशिक : जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य झाले आहे. यापुढे जलयुक्‍त शिवार योजनेची यंत्रणा जलयुक्त झालेल्या गावांत कायमस्वरूपी चालविण्यासाठी दरवर्षी त्या गावांना अनुदानाच्या रूपात ठराविक निधी देण्याचा शासनाचा विचार आहे, असे प्रतिपादन जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले.

नाशिक : जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य झाले आहे. यापुढे जलयुक्‍त शिवार योजनेची यंत्रणा जलयुक्त झालेल्या गावांत कायमस्वरूपी चालविण्यासाठी दरवर्षी त्या गावांना अनुदानाच्या रूपात ठराविक निधी देण्याचा शासनाचा विचार आहे, असे प्रतिपादन जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले.

येथील ठक्कर डोम येथे आयोजित ‘कृषिथॉन’ प्रदर्शनात जलयुक्त शिवार योजनेत यशस्वी झालेल्या गावांचा व संस्थांचा सत्कार नुकताच श्री. डवले यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की जलयुक्तची फलश्रुती आता राज्यात दिसू लागली आहे. जलयुक्त झालेल्या गावांनी आता पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्‍न होता. मात्र, गावातील जलवितरण आणि जलयुक्तची यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी त्या गावांना शासनातर्फे ठराविक अनुदान देण्याचा विचार आहे. त्यामुळे देखभालीच्या खर्चाची चिंता राहणार नाही, असेही श्री. डवले म्हणाले.

या वेळी विभागीय आयुक्‍त महेश झगडे, प्रा. प्रदीप पुरंदरे, दारफळ उस्मानाबादचे लोकराज्य ग्रामचे मुख्य प्रवर्तक आदित्य गोरे, धुळ्याचे कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांची भाषणे झाली. संयोजक संजय न्याहारकर यांनी स्वागत केले. या वेळी ३६ गावे व संस्थांचा सत्कार करण्यात आला.  

शेतीशी नाते कायम ठेवा : डॉ. राम खर्चे
कृषी उत्पादनात भारताचा क्रमांक पहिला असला, तरी शेतीतील उत्पादकता अजूनही कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर क्षेत्रांत प्रगती करतानाच शेतीशी असलेले आपले नाते कायम ठेवावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांनी येथे केले. ‘कृषिथॉन’ प्रदर्शनाच्या निमित्ताने गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्काराचे वितरण आज डॉ. खर्चे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

इतर बातम्या
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
बियाणे, विमा कंपनीविरुद्ध शेवगावला...नगर ः ‘बीटी कापूस वाणाची लागवड केल्यास हे...
...जीव लावलाय मालकावरीकोल्हापूर : ‘गेली सांगून ज्ञानेश्‍वरी, माणसापरीस...
शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा...अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत २०१६-...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...मुंबई  ः कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
‘महाबीज’च्या ‘बीटी’ला बोंड अळीने पोखरलेनागपूर  ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे...
बिगर नोंदणीकृत निविष्ठांची राज्यव्यापी...पुणे : बिगर नोंदणीकृत निविष्ठांची तपासणी...
तापमानातील फरकाचा भाज्या, फळबागांना फटकापुणे : राज्याच्या विविध भागांत दिवसा आणि...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
शेतकरीप्रश्नी आता देशव्यापी लढा : किसान...अकोला ः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक लाॅंग...
तापमानातील तफावत कायमपुणे : राज्याच्या दिवस रात्रीच्या तापमानात चढ-...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...