agriculture news in Marathi, will meet prime minister for sugar industry issue, Maharashtra | Agrowon

साखर उद्योगप्रश्नी पंतप्रधानांना भेटणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 एप्रिल 2018

पुणे ः साखर उद्याेगांच्या विविध समस्या, उपाययाेजनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना शिष्टमंडळासह भेटणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी (ता. ७) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पुणे ः साखर उद्याेगांच्या विविध समस्या, उपाययाेजनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना शिष्टमंडळासह भेटणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी (ता. ७) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

देशमुख म्हणाले, "साखर उद्याेगामध्ये देशात महाराष्ट्र आणि उत्तरप्रेदश आघाडीवर आहेत.  साखरेचे माेठ्याप्रमाणावर हाेणारे उत्पादन आणि दराची समस्येबाबत राज्य सरकारने साखऱ खरेदी प्रस्ताव, घरगुती आणि आैद्याेगिक साखरेच्या दर वेगळे असावेत, एफआरपी देणयासाठी सॉफ्ट लाेन, आॅक्टाेबर महिन्यात कारखाने सुरू करून कच्च्या साखरचे उत्पादन आणि निर्यात, प्राईज स्टॅबीलीटी फंड, आदि विविध मागण्या आणि मुद्यांवर पंतप्रधान माेदींची भेट घेणार आहे.''

राज्यातील विराेधांच्या हल्लाबाेल यात्रेमध्ये हाेणाऱ्या आराेपांबाबत मंत्री देशमुख म्हणाले, ''राज्यात २५ लाख तूर खरेदीची रक्कम सुमारे १३५० काेटी असून, २ हजार काेटींचा गैरव्यहाराचा विराेधकांचा आराेप हा हास्यास्पद आणि बिनबुडाचा असून, विराेधकांची किव करावीशी वाटते. तर साेलापूर येथील माझा बंगल्याची जागा मी आमदार हाेण्यापूर्वीची खरेदी केलेली असून, या जागेवर आरक्षणाची गरज नसल्याचा अहवाल पालिकेने सरकारला पाठविला आहे. मात्र, मंत्रालयाला लागलेल्या आगीत ही फाईल जळाली असून, जागा आणि बांधकाम कायद्याच्या चाैकटीतच आहे.''

राज्यात २ हजार काेटींचा तूर घाेटाळा झाला असल्याचे विराेधक म्हणत आहेत. मात्र गेल्या हंगामात राज्यात एकूण खरेदी केलेल्या २५ लाख क्विंटल तुराची किंमतच १३५० काेटी एवढी आहे. तर २ हजार काेटींचा घाेटाळा कसा हाेऊ शकताे? माझे गणित कच्चे असल्याने हे मला कळत नाही. खरेदी केलेल्या तुरी पैकी दीड लाख क्विंटल तुर भरडली असून, त्याच्या विक्रीसाठी १९ खरेदीदारांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. दीड लाख क्विंटल तूर शासनाच्या विविध विभागांना दिली असून, त्याचे ३०० काेटी रुपये आले असून उर्वरित पैसे येणे बाकी आहे. यामुळे २ हजार काेटींच्या गैरव्यवहाराचा आराेप बिनबुडाचा आहे.

अद्याप ९० टक्के तूर शिल्लक असून, ती टप्प्याटप्याने विक्री करणार आहे. तर नवीन हंगामासाठी तूर खरेदी आणि गाेदामाच्या उपलब्धतेतेसाठी खासगी, बाजार समित्यांची गाेदामे अधिग्रहीत करण्यात येणार आहे. तर साठणुककीसाठी सायलाेस उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, बारामतीच्या सायलाेजबाबत माहिती नसल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितले. 

साेलापूरच्या बंगल्याबाबत बाेलताना मंत्री देशमुख म्हणाले, ''कायद्याच्या चाैकटीत जागा खरेदी आणि बंगल्याचे बांधकाम मी आमदार हाेण्यापूर्वी केलेले आहे. तर या जागेवर आरक्षणाची गरज नसल्याचा प्रस्ताव पालीकेने शासनाला पाठविला असून, मंत्रालयाला लागलेल्या आगीत ती फाईल जळाली अाहे.''
पणन मंडळाच्या वतीने आयाेजित आंबा महाेत्सवाचे उद्‌घाटन मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी पणन संचालक डॉ. अानंद जाेगदंड, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे उपस्थित हाेते. 

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...