agriculture news in marathi, Windy damage in Mandtha taluka | Agrowon

मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

यावर्षी हळदीच्या पिकाचे बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले असते. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी तयार झालेली हळद वाळू घातली. ती अवकाळी पावसाने भिजून खराब झाली आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने बाहेर गावी गेलेल्यांचे जास्त नुकसान झाले. 
- दत्तात्रय बोराडे, माजी सभापती, मंठा बाजार समिती.

मंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता. १६ ) रात्री वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंठा तालुक्यात यावर्षी हळदीचे पीक बऱ्यापैकी अाहे. अनेक शेतकऱ्यांनी शिजवून शेतात वाळू घातलेेले हळदीचे पीक भिजले. रात्री पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.  

अंभोडा कदम येथे भारत देवीदासराव बोराडे यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात शेततळे घेऊन, शेडनेट उभारून दुष्काळी परिस्थितीदेखील भाजीपाल्याचे पीक चांगल्याप्रकारे जोपासले. परंतु, मंगळवारी आलेल्या वादळी वाऱ्याने शेडनेट फाटल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी शाळू ज्वारीच्या कडब्याची वळई (गंजी) रचून ठेवली होती. वादळी वाऱ्याने कडबा उडून गेला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला.

अंभोडा कदम परिसरातील पंधरा विजेचे खांब पडले. या भागातील वीजपुरवठा बंद झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. ऐनवेळी वाळू घातलेली हळद जमा करता आली नाही, तर काहींना हळदीवर झाकण्यासाठी प्लॅस्टिकची ताडपत्री मिळाली नाही. आर्डा खारी येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. उडालेले पतरे लागून अच्चुत निवृत्ती कळणे यांच्या बैलाचा मृत्यू झाला. भारतराव देवीदासराव बोराडे यांनी शेडनेटमुळे भाजीपाल्याचे पीक चांगल्याप्रकारे जोपासले.

शेततळ्याच्या भरवशावर सीताफळ, अॅपल बोर, लिंबूणी, राय जांभूळ या फळ बागा सध्या चांगल्या स्थितीत आहेत. वीज वितरण कंपनीने या भागातील विजेच्या खांबाची पाहणी करून मोडलेल्या व पडलेल्या वीज खांबाच्या ठिकाणी तात्काळ नवीन वीज खांब बसवून वीजपुरवठा सुरू करावा, शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आहे. 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...