agriculture news in marathi, without notification to ministers, the tender is published | Agrowon

शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना न जुमानता निविदा केल्या प्रकाशित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

अकलूज, जि. सोलापूर : शेती महामंडळाच्या सहसंयुक्त शेतीधारकांना न्याय देण्याची भूमिका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. मात्र, त्यांच्या आदेशाला न जुमानता अधिकाऱ्यांनी या जमिनीच्या निविदा प्रकाशित केल्या. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान, अधिकाऱ्यांनी महसूलमंत्र्यांचा आदेश धुडकावून लावल्याचेच त्यातून स्पष्ट होत आहे.

अकलूज, जि. सोलापूर : शेती महामंडळाच्या सहसंयुक्त शेतीधारकांना न्याय देण्याची भूमिका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. मात्र, त्यांच्या आदेशाला न जुमानता अधिकाऱ्यांनी या जमिनीच्या निविदा प्रकाशित केल्या. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान, अधिकाऱ्यांनी महसूलमंत्र्यांचा आदेश धुडकावून लावल्याचेच त्यातून स्पष्ट होत आहे.
माळशिरस तालुक्‍यातील शेती महामंडळाच्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा हा प्रश्‍न आहे. या शेतकऱ्यांना वीज जोड घ्यायला व शेततळी करायला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ना-हरकत पत्रे दिली. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः जमिनी मोजून दिल्या. सहसंयुक्त शेतीधारक अशी या शेतकऱ्यांची यादी तयार केली.

महामंडळाच्या कार्यालयात करारदार शेतकऱ्यांचे सत्कार केले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी पिके लावली आहेत. ३० मे रोजी या पिकांना धोका नसल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले होते. तर २८ नोव्हेंबर रोजी या शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला जाऊ द्या. त्यांचे करार नियमित करून द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

तरीही अधिकारी ऐकायला तयार नाहीत. महसूलमंत्र्यांनी लेखी आदेश दिलेले नाहीत, त्यामुळे ऊस जाऊ देणार नाही आणि करार नियमित करून देणार नाही, असे सांगून व्यवस्थापकीय संचालकांनी या जमिनींची निविदा प्रक्रियाच सुरू केली आहे.

४६८ एकर क्षेत्रावरील पिकांचा प्रश्‍न
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने केलेल्या सहसंयुक्तधारक शेतकरी यादीनुसार सहा गावांतील ५५ शेतकऱ्यांकडे सुमारे ४६८.२५ एकर क्षेत्र या जमिनीवर सुमारे दोनशे एकर ऊस तर उर्वरित क्षेत्रावर केळी, डाळिंब, मका यासह चारा पिके, काही क्षेत्र पडीक आहे.

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...