agriculture news in marathi, Without Shivsena RPI will be with BJP says Minister Ramdas Adhavale | Agrowon

शिवसेना नसली तरी रिपाई भाजपसोबत : रामदस आठवले
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नागपूर : शिवसेनेने भाजप सोबत युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट पडेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याबाबत पुनर्विचार करावा. शिवसेनेने भाजपसोबत युती केली नाही तरी रिपाइं मात्र भाजपसोबत राहील, असे रिपाइं (आ.) गटाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

नागपूर : शिवसेनेने भाजप सोबत युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट पडेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याबाबत पुनर्विचार करावा. शिवसेनेने भाजपसोबत युती केली नाही तरी रिपाइं मात्र भाजपसोबत राहील, असे रिपाइं (आ.) गटाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

नागपूर दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, शिवसेनेचे संजय राऊत, सुभाष देसाई यांच्याशी आपण चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर शिवसेनेशी बोलावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही बाब टाकली आहे. ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

या वेळी रामटेक लोकसभा लढविणार
१९९८ मध्ये आपण दक्षिण-मध्य मुंबईमधून निवडणूक जिंकलो होतो. या वेळी भाजप-शिवसेना युती झाली तर त्याच मतदारसंघातून लढण्याचा आपला विचार आहे. मात्र युती झाली नाही तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. आपण याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. मी विदर्भवादी आहे, त्यामुळे या मतदारसंघात मला विरोध होणार नाही, असा दावाही रामदास आठवले यांनी केला.

सर्व घटकांना जोडणार
२७ मे रोजी पुणे येथे रिपाइंचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पुढील काळात दलितांसह ओबीसी, मराठा, मुस्लिम अशा सर्वच समाजातील घटकांना पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. या सर्वांना सोबत घेऊन गावागावात शाखा उघडण्यात येतील, असेही रामदास आठवले म्हणाले. 

इतर ताज्या घडामोडी
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...
मंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला?जळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता...
‘ईव्हीएम’चा विजय असो : छगन भुजबळनाशिक  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये...
सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंना...सातारा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...