agriculture news in marathi, Women, citizens in city, guarded by guardian minister | Agrowon

नगरमध्ये महिला, नागरिकांनी अडवला पालकमंत्र्यांचा ताफा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

नगर : दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत असलेल्या पालकमंत्री राम शिंदे यांचा ताफा काल आंतरवली बु. (ता. शेवगाव) येथे महिला, नागरिकांनी ताफा अडवला. पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी सोय, बोंड अळीचे रखडलेले अनुदान, चाऱ्याचा प्रश्न आदी विषयांवर ग्रामस्थ आक्रमक होते.

नगर : दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत असलेल्या पालकमंत्री राम शिंदे यांचा ताफा काल आंतरवली बु. (ता. शेवगाव) येथे महिला, नागरिकांनी ताफा अडवला. पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी सोय, बोंड अळीचे रखडलेले अनुदान, चाऱ्याचा प्रश्न आदी विषयांवर ग्रामस्थ आक्रमक होते.

जिल्हाभरात सध्या तीव्र दुष्काळ पडला आहे. शेवगाव, पाथर्डी, नगर, पारनेर, कर्जत, जामखेड भागांत दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पालकमंत्री राम शिंदे दुष्काळी भागातील परिस्थितीची पाहणी करत आहेत. काल (गुरुवारी) नगर, पाथर्डी तालुक्यांतील काही भागांत पाहणी करून पालकमंत्री शिंदे शेवगाव तालुक्यात गेले. शेवगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कुठे पाहणी करायची हे ठिकाण निश्चित केले होते.

ठरल्याप्रमाणे आंतरवली बुद्रुक येथे पालकमंत्री शिंदे दुष्काळ पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती कळताच ग्रामस्थ जमा झाले. शिंदे येताच पाहणी करण्याच्या ठिकाणापासून काही अंतरावरच महिलांनी आडवे येऊन ताफा अडवला. बंद असलेली प्रादेशिक  पाणीपुरवठा नळयोजना सुरू करा, चारा, बोंड अळीचे थकीत अनुदान आदी विषयांवर ग्रामस्थ आक्रमक होते. त्यात महिलांही आक्रमक होत्या.

जवळपास पंधरा मिनिटांपेक्षा अधिक काळ ताफा अडवला होता. शेवटी शिंदे यांनी अश्वासन दिल्याने वाट मोकळी झाली. मात्र नसती आफत म्हणून कृषी अधिकारी मात्र चांगलेच तणावाखाली होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा रोषाला नेत्या, मंत्र्यांना सामोरे तर जावे लागणार नाही ना? या प्रश्नाने प्रशासनही सावध झाले आहे. तालुका पातळीवर होत असलेल्या आढावा बैठकातही लोक अधिकारी, पदाधिकाऱ्यावर रोष व्यक्त करू लागले आहेत.

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...