Agriculture News in Marathi, women farmers expressed their issues in front of NCP leaders, Yavatmal District | Agrowon

हे सरकार गरिबांचे नाही
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 डिसेंबर 2017
यवतमाळ  ः ‘‘नवरा गेल्यावर तीन मुलं, आजारी दीराचा सांभाळ या दोन एकरांच्या तुकड्यावरच करते; वलीताची जरा सोय झाली तर बरं होईल, असं वाटतं. म्हणून गेल्या कित्येक वरसापासून विहिरीसाठी अर्जावर अर्ज केले; पण कायबी फायदा झाला नाई ताई..! तथून विश्‍वास पटला की सरकार आमच्या गरिबासाठी हायेच नाई,’’ असे सांगताना विधवा शेतकरी संगीता काळे यांचे डोळे पाण्याने डबडबले. 
 
यवतमाळ  ः ‘‘नवरा गेल्यावर तीन मुलं, आजारी दीराचा सांभाळ या दोन एकरांच्या तुकड्यावरच करते; वलीताची जरा सोय झाली तर बरं होईल, असं वाटतं. म्हणून गेल्या कित्येक वरसापासून विहिरीसाठी अर्जावर अर्ज केले; पण कायबी फायदा झाला नाई ताई..! तथून विश्‍वास पटला की सरकार आमच्या गरिबासाठी हायेच नाई,’’ असे सांगताना विधवा शेतकरी संगीता काळे यांचे डोळे पाण्याने डबडबले. 
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हल्लाबोल मोर्चा यवतमाळ जिल्ह्यातील कळंबवरून पुढे मार्गस्थ झाला. वाटेत संगीता काळे या महिलेच्या शेताला मोर्चातील खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, चित्रा वाघ यांनी भेट दिली.
 
यावेळी संगीता काळे या कापूस वेचत होत्या. संगीता काळे यांनी प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढाच यावेळी वाचला. गेल्या अनेक वर्षांपासून विहिरीसाठी अर्ज दिला. परंतु राजकीय पाठबळ नसल्यामुळे आजवर विहिरीची मागणी पूर्णत्वास गेली नाही, अशी खंत संगीता काळे यांनी व्यक्‍त केली. 
 
गेल्या चार पाच वर्षांपासून विहिरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला; परंतु आजवर काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे यापुढे अर्ज करावा किंवा नको अशी मानसिकता झाल्याचे संगीता काळे यांनी सांगितले. 
 
त्यांच्या शेतशिवाराला भेट देण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कळंब ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे भेडसावणाऱ्या प्रश्‍नांची जंत्रीच मांडली. त्यामध्ये वीज, पाणी, खराब रस्ते, शेतरस्ते यांसारख्या समस्यांचा समावेश होता. 
 
...त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला
संगीता काळे यांनी खासदार सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. अजित पवार यांनी त्यांची व्यथा समजून घेत तत्काळ मोबाईलवरून यवतमाळ जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला. संगीता काळे यांची ही मागणी श्री. पवार यांनी त्यांच्यापर्यंत पोचविली.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...