agriculture news in Marathi, Wood implements exile; The time of starvation on the slopes | Agrowon

लाकडी अवजारे हद्दपार; सुतारांवर उपासमारीची वेळ
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

रिसोड, जि. वाशीम ः आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू लागल्यानंतर शेतीत लाकडी अवजारांचा वापर कालबाह्य ठरला. ट्रॅक्टरवर चालणारी विविध लोखंडी अवजारे बाजारात आली. तसेच बैलांच्या साह्याने वापरता येणारी अवजारेही तयार झाली. यामुळे आता लाकडी अवजारांचा वापर पूर्णतः थांबला आहे. यामुळे ग्रामीण भागात पूर्वी दिसणारे ही कारागिरीसुद्धा लोप पावत चालली.

रिसोड, जि. वाशीम ः आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू लागल्यानंतर शेतीत लाकडी अवजारांचा वापर कालबाह्य ठरला. ट्रॅक्टरवर चालणारी विविध लोखंडी अवजारे बाजारात आली. तसेच बैलांच्या साह्याने वापरता येणारी अवजारेही तयार झाली. यामुळे आता लाकडी अवजारांचा वापर पूर्णतः थांबला आहे. यामुळे ग्रामीण भागात पूर्वी दिसणारे ही कारागिरीसुद्धा लोप पावत चालली.

सध्या ग्रामीण भागात लग्न समारंभाचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे तशीच पडून आहेत. बरेचशे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने कपाशी उपटनी, नांगरणी तसेच वखरणी करून शेतातील कामे उरकून घेताना दिसून येत आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने त्यातच नातेवाइकांचे लग्न तिथी दाट असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीच्या कामांसाठी मोठी दमछाक होत आहे.

शेतकऱ्यांना एक एकर शेती नागरंटी करण्यासाठी बाराशे ते चौदाशे रुपये खर्च येत आहेत. अलीकडच्या काही वर्षांपासून लाकडी वखर, तिफन, कोळपे, बैलगाडीसह इतर शेतीपयोगी अवजारे कालबाह्य झाली आहे. नवनव्या यंत्रांमुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती मशागतसुद्धा मागे पडत चालली. शेती कामासाठी लागणारी सगळीच लाकडी अवजारे आता दिसत नाहीत. लाकडी अवजारांची वाढती किंमत, मजुरी व दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. शिवाय या अवजारांकडे दुर्लक्ष झाले तर मातीच्या संर्पकामुळे त्यांना उधळी लागते, त्यामुळे तुलनेने वापरायला सोईच्या असलेल्या लोखंडी अवजारांनी शेतीमध्ये बळकट स्थान मिळवले. पेरणीसाठी लाकडी तिफनही आता नजरेआड झाली आहे.

बैलजोड्यांच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर पोचल्याने बैलजोडी खरेदी करण्यापूर्वी शेतकरी अनेकदा विचार करतात. याशिवाय शेतात मजूर मिळत नसल्याने शेतीच्या मशागतीसाठी हल्ली ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 

प्रतिक्रिया
पूर्वीच्या बलुतेदार पद्धती वेगाने बंद पडत आहेत. पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीपयोगी साहित्याची दुरुस्ती केल्यास मुबलक प्रमाणात अन्नधान्याची रास मिळत होती. परंतु, मागील काही वर्षांमध्ये लाकडी आवजाराची जागा लोखंडी अवजारांनी घेतल्याने सुतारगिरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबांचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे.
- मदन कांबळे, लाकूड कारागीर

इतर ताज्या घडामोडी
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...
जळगावात भाजीपाला आवकेत घटजळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक...पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी...
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे...पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी...
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...