agriculture news in marathi, Work with coordination for drought relief: Guardian Secretary Kunte | Agrowon

दुष्काळ निवारणार्थ समन्वयाने काम करा : पालक सचिव कुंटे
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांबरोबरच जनावरेही बेजार झाली आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले.

नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांबरोबरच जनावरेही बेजार झाली आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले.

सिन्नर तालुक्यातील गुळवंच गावात सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना कुंटे यांनी गुरुवारी (ता.१६) भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी निर्मळ, उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, जलसंधारण अधिकारी सागर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड उपस्थित होत्या.

कुंटे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या पशुधनाला चांगला सकस चारा मिळावा, यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. छावणीतील प्रत्येक लहान-मोठ्या जनावरांची छावणी चालकांनी नोंद ठेवावी. जनावरांना शासन निकषांनुसार चारा, खुराक देऊन आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे. पाऊस पडण्यासाठी आणखी बराच कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. त्याचप्रमाणे मागणीनुसार नागरिकांना पाण्याचे टँकर मंजूर करावेत.

 कुंटे यांनी चारा छावणी सुरू करणाऱ्या ग्रामविकास फाउंडेशनच्या सदस्यांसोबत चर्चा केली. छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांचे टॅगिंग करण्याची सूचना देत त्यांनी पशुपालकांशी संवाद साधला. आजपर्यंत गुळवंच चारा छावणीत ८३ जनावरांची नोंद झाली. त्यात ७० मोठी, तर १३ लहान जनावरे असल्याची माहिती फांउडेशनच्या सदस्यांनी दिली. जिल्ह्यातील पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा, टँकर, विहिरींचे अधिग्रहण, पाणीपुरवठा, चारा छावणीबाबत प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी कुंटे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, कुंटे यांनी पाझर तलावाच्या दुरस्तीकामाचे, कुंदेवाडीतील देव नदीवरील नाला खोलीकरण, रुंदीकरण व साठवण बंधारे, डुबेरे गावातील सोपान पावसे यांच्या डांळिंब बागेतील मल्चिंग काम, आशापूर, टेंभूरवाडी येथील वॉटरकप फाउंडेशनच्या कामाची त्यांनी या वेळी पाहणी केली.

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...