agriculture news in Marathi, The work of Nevri distribution will be started from 22nd February | Agrowon

टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२ फेब्रुवारीपासून सुरू होणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका आणि त्यावरील नऊ उपवितरिकांची कामांची सर्व्हेक्षण केले आहे. ही कामे शुक्रवार (ता. २२) फेब्रुवारीपासून सुरू केली जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका आणि त्यावरील नऊ उपवितरिकांची कामांची सर्व्हेक्षण केले आहे. ही कामे शुक्रवार (ता. २२) फेब्रुवारीपासून सुरू केली जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

टेंभू उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावांना पाणी मिळाले आहे. मात्र, अद्यापही अनेक गावे या योजनेपासून वंचित आहेत. या गावांना पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने आराखडे तयार केले आहेत. टेंभूच्या नेवरी वितरिकेच्या आराखड्यास गेल्या पाच वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली असून, काम करण्याचा ठेकाही दिला होता. ज्या कंपनीने या कामा ठेका घेतला होता. त्याने कामाला सुरवात केली नाही. या वितरिकेची कामे कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता की कामे मार्गी लागली आहे. ही वितरिका कडेगाव आणि खानापूर या दोन तालुक्यांच्या सीमेवरून जात आहे. या कामाच्या आराखड्याला पुन्हा मंजुरी मिळाली आहे. 

खानापूर-तासगाव कालव्याच्या २४ किलोमीटरला गार्डी गावाजवळ टेंभूची ही नेवरी वितरिका सुरू होते आहे. सुमारे १४ किलोमीटर लांबीची ही वितरिका आहे. या वितरिकेतून थेट ९६५ हेक्टरसाठी तर उपवितरिकांच्या माध्यमातून ३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 

वितरिकांच्या परिघात दोन्ही 
बाजूस ३८ किलोमीटरपर्यंत टेंभूचे पाणी मिळणार आहे. खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर पाणी येणार असल्याने द्राक्ष पिकास याचा फायदा होईल. यामुळे या भागात कायम असलेली पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

थेट ओलिताखाली येणारी गावे
गावे क्षेत्र
गार्डी ६८
घानवड १३८
हिंगणगादे ११९
विटा ४५७
ढवळेश्वर ५४८
कळंबी ३६
भाळवणी २२३
नेवरी १२७१
आंबेगाव २०४
शेळकबाव १११
वडियेरायबाग ६६८

 

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...