agriculture news in marathi, work order sanction for farm roads, solapur, maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी 
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जानेवारी 2019

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून पाणंद रस्त्यांची सातत्याने मागणी होत होती. अखेरीस या योजनेतून जिल्ह्यातील १६२ प्रस्तावित पाणंद रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून पाणंद रस्त्यांची सातत्याने मागणी होत होती. अखेरीस या योजनेतून जिल्ह्यातील १६२ प्रस्तावित पाणंद रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. 

राज्य शासनाने शेतांकडे जाणारे गाडी मार्ग, कच्चे रस्त्यांचे मजबुतीकरण व बळकटीकरण करण्यासाठी पालकमंत्री पाणंद रस्ते योजना आखली. मात्र जिल्ह्यात त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. माहितीचा अभाव आणि अधिकाऱ्यांकडूनही फारशी जागृती नसल्याने गाव व तालुका पातळीवरून प्रस्तावच प्राप्त झाले नाहीत. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बैठक घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डिसेंबर महिन्यात सर्व तहसील स्तरावरून प्रस्ताव मागविण्यात आले.

पहिल्या टप्प्यात १ कोटी २७ लाखांच्या निधीतून २५४ किलोमीटर पाणंद रस्ते तयार होणार आहेत, येत्या महिनाभरात पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहे. ज्या ठिकाणी कच्चा रस्ता नाही अशा ठिकाणी रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्यात येणार आहे.  

तालुकानिहाय कामे व कंसात कामासाठी मिळालेला निधी ः उत्तर सोलापूर : ६ (५ लाख ४० हजार), बार्शी : ७ (६ लाख ५० हजार), दक्षिण सोलापूर : २२ (१७ लाख ५० हजार), अक्कलकोट : ५  (५ लाख ५० हजार), पंढरपूर : २३ (२० लाख ६२ हजार), मोहोळ : १७ (१४ लाख ९० हजार), माढा : ११ (१३ लाख), करमाळा : १३ (१० लाख), मंगळवेढा : ८ (५ लाख ७५ हजार), सांगोला : २० (१३ लाख ५० हजार) माळशिरस : ३० (१४ लाख ५० हजार).

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...