agriculture news in marathi, Workshop for farmers every Wednesday | Agrowon

शेतकऱ्यांसाठी दर बुधवारी कार्यशाळा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कार्यशाळा घेण्यात येणार अाहे. यात शासनाच्या विविध योजनांची माहिती अधिकारी देतील तसेच प्रगतिशील शेतकरी त्यांचे अनुभवन या वेळी मांडतील, असे जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात अाले अाहे.

अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कार्यशाळा घेण्यात येणार अाहे. यात शासनाच्या विविध योजनांची माहिती अधिकारी देतील तसेच प्रगतिशील शेतकरी त्यांचे अनुभवन या वेळी मांडतील, असे जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात अाले अाहे.

रोजगारक्षम शेती व्यवसायातंर्गत शेतकरी हा स्मार्ट उद्योजक हा उपक्रम जिल्हा प्रशासनाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी अास्तीककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारानीया, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शरद वाळके, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. ठाकरे, रेशीम अधिकारी श्री. मानकर यांच्यासह कृषी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेऊन स्वत: रोजगारक्षम शेती करावी, स्मार्ट उद्याेजक बनावे, असे श्री. पाण्डेय या वेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या विविध यंत्रणा कार्यान्वित आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून शेतीसोबत शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील असते, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, की रोजगारक्षम शेती व्यवसाय या सदराखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता स्मार्ट उद्याेजक बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांकरिता साप्ताहिक मुक्त कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

पाण्डेय म्हणाले, की प्रत्येकाच्या जीवनात तणाव आहे, त्यामुळे कुठलीही टोकाची भूमिका न घेता खंबीरपणे जीवनाला सामोरे जावे. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती करावी. प्रशासन आपल्या पाठीशी आहे.

इतर बातम्या
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...