agriculture news in marathi, workshop on land sealing law, pune, maharashtra | Agrowon

जमीन सिलिंग कायदा शेतीसाठी अडथळा : मकरंद डोईजड
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पुणे   ः घटनेतील तरतुदीत बदल करून सुधारित जमीन सिलिंग कायदा तयार केल्यामुळे शेतीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत. हा कायदा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे, असे मत किसान पुत्र आंदोलनाचे मकरंद डोईजड यांनी व्यक्त केले.

पुणे   ः घटनेतील तरतुदीत बदल करून सुधारित जमीन सिलिंग कायदा तयार केल्यामुळे शेतीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत. हा कायदा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे, असे मत किसान पुत्र आंदोलनाचे मकरंद डोईजड यांनी व्यक्त केले.

इन्स्टिट्यूट आॅफ अॅग्रीकल्चरल टेक्नाॅलाॅजिस्ट या संस्थेमार्फत पुणे कृषी महाविद्यालयात ‘ शेती, शेतकरी कायदे’ या विषयावर शुक्रवारी (ता. १२) चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, माजी प्रधान सचिव महेश झगडे, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब, डॉ. रामकृष्ण मुळे, माजी कृषी आयुक्त कृष्णा लव्हेकर, माजी विभागीय आयुक्त मधुकर कोकाटे, माजी जिल्हाधिकारी दिलीप कोलते, माजी कुलगुरू डाॅ. किसन लवांडे, डाॅ. शंकरराव मगर, डाॅ. व्यंकट मायंदे, डाॅ. योंगेद्र नेरकर, कृषी विभागाचे विस्तार विभागाचे माजी संचालक सुभाष जाधव, जयंत देशमुख, मच्छिंद्र घोलप, जयवंत महल्ले, विजय पाटील, फलोत्पादन संचालक प्रल्हाद पोकळे, शेतकरी संघटनेचे अनंतराव देशपांडे, अनिल घनवट आदी उपस्थित होते.

श्री. डोईजड म्हणाले, की शेतकऱ्यांना संविधान साक्षर करून शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची गरज आहे. घटनेच्या परिशिष्ट नऊ ब मधील कायद्याविरुद्ध न्यायायलात जात येत नसले तरी, ३१ ब च्या विरोधात न्यायालयात जाण्यास मनाई नाही. ३१ ब असंवैधानिक ठरले तर परिशिष्ट नऊ आपोआप गळून पडते, या याचिकेचे महत्त्व लक्षात घेऊन गेल्या ६७ वर्षांत अशी याचिका दाखल झालेली नाही. पहिल्यांदा एका किसानपुत्राने सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी दस्तक दिली आहे.

महेश झगडे म्हणाले, की आपल्याकडे जमीन मालकीचा कायदा अस्तित्वात नाही. शेतीच्या हिताचे कायदे फार कमी आहेत. जे आहेत त्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. पुढील काळात शेतकऱ्यांच्या जमिनीची मालकी सुरक्षित राहावी, यासाठी कायद्याची यंत्रणा असणे आवश्यक आहे.

उमाकांत दांगट म्हणाले, की शेती हा राज्याचा विषय आहे. त्यावर शेतीविषयक कायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी लागू करण्याची जबाबदारी राज्यशासनाची आहे. परिशिष्ट नऊ मध्ये २८४ कायदे समाविष्ट आहेत. त्यातील बऱ्याच कायद्यांमुळे शेतकरी अडचणीत आले आहे.  

अमर हबीब म्हणाले, की सिलिंग कायद्याचा मोठा दुप्षरिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. शेतकऱ्यांसाठी क्षेत्राचे बंधन घातल्यामुळे शेतीत प्रगती झालेली नाही. या कायद्यामुळे भ्रष्टाचार वाढलेला आहे. सद्यःस्थितीत तो कालबाह्य झाला असल्याने रद्द करणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी कंपन्यांना सिंलिग कायद्यातून वगळले जावे, अशी मागणी त्यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...