agriculture news in marathi, workshop on pink bollwarm, jalna, maharashtra | Agrowon

`शेतकऱ्यांनी पऱ्हाटी निर्मूलन सप्ताह राबवावा`
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018
२००९ पासून कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत गेला. यंदा त्याचा उद्रेक झाल्याने उत्पादनात घट आली. यावर नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन हा एकमेव उपाय असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी सामूहिकरीत्या पुढे यावे. कृषी विद्यापीठानेही शेतकऱ्यांकरिता कोरडवाहू तसेच बागायतीसाठी चांगले वाण संशोधित करावे. सरळ व देशी वाणाबाबतही संशोधन व्हायला हवे. 
- डॉ. वाय. एस. नेरकर, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
जालना  : मराठवाड्यासह राज्यातील कपाशीवर झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाबाबत मंगळवारी (ता. ३०) स्थानिक कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. सहभागी तज्ज्ञांनी उपस्थित कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. पुढील हंगामात कपाशीचे पीक घेता यावे, म्हणून यंदा फरदड न घेता पऱ्हाटी निर्मूलन सप्ताह राबविण्याचे आवाहनही या वेळी तज्ज्ञांनी केले. 
 
जालना येथील कृषी विज्ञान केंद्र व आत्माच्या संयुक्‍त विद्यमाने कपाशीवरील गुलाबी बोंड अळीविषयी जागृती व व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  
कार्यशाळेला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर, कृषी आयुक्‍तालयातील माजी संचालक डॉ. एस. एल. जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, ‘वनामकृवी’चे कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. आर. झंवर, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. एस. बेग, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, विषय विशेषज्ञ प्रा. ए. जी. मिटकरी उपस्थित होते. 
 
कार्यशाळेचे उद्‌घाटन माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. नेरकर यांच्यासह विजयअण्णा बोराडे, डॉ. एस. एल जाधव आदींनी आपल्या अनुभवातून गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. झंवर यांनी गुलाबी बोंड अळीच्या येत्या काळातील नियंत्रणाविषयी माहिती दिली. 
प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन अजय मिटकरी यांनी केले. आभार आत्माचे उपसंचालक हादगावकर यांनी मानले. या कार्यशाळेत सातशे कापूस उत्पादक सहभागी झाले होते.
 
कीटकशास्त्रज्ञ डॉ. झंवर यांचा सल्ला
  •  फरदडचा मोह कटाक्षाने टाळा.
  •  पऱ्हाट्या जाळून किंवा कंपोस्ट करून नष्ट करा.   
  •  पुढील वर्षी पिकाची फेरपालट करा.
  •  कमी कालावधीच्या वाणांची लागवड करा.
  • लागवडीवेळी कीड नियंत्रणासाठी सापळा पिकांची लागवड करा. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...