agriculture news in Marathi, world cotton production and trade increased, Maharashtra | Agrowon

जागतिक कापूस उत्पादन, व्यापारात वाढ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 मार्च 2018

वॉशिंग्टन, अमेरिका ः जागतिक कापूस उत्पादन आणि व्यापारात २०१७-१८ मध्ये वाढ झाली आहे. आॅस्ट्रेलिया आणि सुदान या दोन्ही देशांत कापूस उत्पादनवाढीचा अंदाज असल्याने आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात वाढ होणार आहे, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला आहे.

वॉशिंग्टन, अमेरिका ः जागतिक कापूस उत्पादन आणि व्यापारात २०१७-१८ मध्ये वाढ झाली आहे. आॅस्ट्रेलिया आणि सुदान या दोन्ही देशांत कापूस उत्पादनवाढीचा अंदाज असल्याने आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात वाढ होणार आहे, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला आहे.

यंदा जगातील अनेक महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांमध्ये अनेक कारणांमुळे उत्पादनात घट आली आहे, तर आॅस्ट्रेलिया आणि सुदान या दोन देशांमध्ये कापूस उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक उत्पादन आणि व्यापारातही वाढ झाली आहे; परंतु उझबेकिस्तान आणि अमेरिकेतील उत्पादनात घट आली आहे. टर्की, व्हिएतनाम आणि चीन या देशांमध्ये आयात वाढल्याने जागतिक व्यापारात वाढ झाली आहे.

या वेळी अमेरिकेच्या निर्यातीत वाढ झाली आहे. जागितक कापूस उत्पादनवाढीमुळे उपभागात यंदा वाढ झाली आहे; तसेच स्टॉकमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे. अमेरिकेत यंदाच्या कापूस हंगामाच्या बॅलन्स शीटवर कमी उत्पादन, जास्त निर्यात आणि कमी स्टॉक अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टर्की देशात स्थानिक कापड उद्योगाकडून मागणी वाढल्याने आयात वाढली आहे. बांगलादेशात सूतगिरण्यांकडून मागणी वाढल्याने तुटवडा भरून काढण्यासाठी आयात केली जात आहे. तसेच चीन, व्हिएतनाम आणि तैवान या देशांकडून कापूस आयात वाढली आहे. 

बांगलादेशाची आयात वाढली
बांगलादेशातील रुईला इतर देशांतील कापड उद्योगांकडून मोठी मागणी असते. त्यामुळे २०१७-१८ मध्ये बांगलादेशची कापूस आयात ११ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी ६.३ लाख गाठी कापूस आयात झाली होती, तर २०१७-१८ मध्ये ७ लाख गाठी आयात झाल्या आहेत. बांगलादेश हा भारतीय कापसाचा मोठा आयातदार देश आहे. भारतातून कापूस आयात करून येथून विविध कापड वस्तू निर्यात केल्या जातात. जुलै ते डिसेंबरदरम्यान बांगलादेशातून भारतात १११.३ दशलक्ष डॉरचे कपडे निर्यात झाले आहेत. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत ६६ टक्क्यांनी जास्त आहे. बांगलादेशातील कापड उद्योगातून जगभरात निर्यात होत असल्याने मागणी जास्त असते. देशात कमी कापूस उत्पादन होत असल्याने मोठी भिस्त ही आयातीवरच असते. त्यातच चीन, जपान, रशिया आणि भारत यांसारखे मोठे देश कापड आयात करत असल्याने मोठी मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कापूस आयातही वाढली आहे आणि येणाऱ्या काळात पुन्हा वाढ होईल, असे यूएसडीएने अहवालात म्हटले आहे.

पाकिस्तानात उत्पादनात वाढ
पाकिस्तान जगातील पहिल्या पाच कापूस उत्पादक देशांमध्ये मोडतो. तसेच भारतीय कापसाचा मोठा आयातदार आहे. पाकिस्तानात लागवड वाढल्याने कापूस उत्पादनात वाढ झाली होती. येथील कापूस उत्पादन २०१८-१९ च्या हंगामात ५ लाख गाठींनी वाढून ८.८ दशलक्ष गाठी उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या हंगामात २.८ दसलक्ष हेक्टरवर कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील कमी किमती आणि यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देणी देण्यात होणारा उशीर यामुळे बरेच शेतकरी येत्या हंगामात कापूस पिकाकडे वळतील. २०१७-१८ मध्ये पाकिस्तानात कापूस आयात वाढली होती. मात्र, २०१८-१९ च्या हंगामात देशातील उत्पादन वाढल्यानंतर आयात कमी होईल. २०१७-१८ मध्ये २.६ दशलक्ष गाठी आयात झाली होती. २०१८-१९ मध्ये ही आयात २.४ दशलक्ष गाठींवर स्थिरावेल. तसेच पाकिस्तानमधून २०१७-१८ मध्ये कापूस निर्यात ३ लाख गाठी झाली होती. त्यात वाढ होऊन २०१८-१९ मध्ये ४ लाख गाठींची निर्यात होईल.

भारताकडून बीटी बियाण्यांच्या किमतीत घट
भारत सरकारने २०१८-१९ हंगामात बीटी बियाण्यांच्या दरात कपात केली आहे. येणाऱ्या हंगामापासून शेतकऱ्यांना नवीन दरानुसार बियाणे मिळणार आहे. बीजी २ बीटी बियाण्यांचे ४५० ग्रॅमचे एक पाकीट आता ७४० रुपयांना मिळणार आहे.
 

घटक बीजी-१ बीजी२ बीजी-१ बीजी२
  २०१६ २०१६ २०१८ २०१८
बियाणे किंमत ६३५ ७५१ ६३५ ७०१
स्वामित्व हक्क, करांसह ४९ ३९
कमाल विक्री मूल्य ६३५ ८०० ६३५ ७४०

जगातील कापूस आयातदार देश

  • टर्की
  • बांगलादेश
  • चीन
  • व्हियतनाम
  • तैवान

जगातील कापूस निर्यातदार देश

  • सुदान
  • अमेरिका
  • उझबेकिस्तान
     

जगातील महत्वाच्या देशातील कापूस उत्पादन (दशलक्ष गाठींमध्ये)

देश उत्पादन
भारत २८.५०
चीन २७.५०
अमेरिका २१
पाकिस्तान ८.२०
ब्राझिस
आॅस्ट्रेलिया ४.७०

 

इतर अॅग्रो विशेष
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...