agriculture news in Marathi, world cotton production will decrease, Maharashtra | Agrowon

जागतिक कापूस उत्पादनात होणार घट
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

मुंबई ः भारत, आॅस्ट्रेलिया, पाकिस्तानच्या कापूस उत्पादनात घटीच्या परिणामामुळे जागतिक कापूस उत्पादनात घट होणार आहे. जागतिक कापूस उत्पादन २५.९७ दशलक्ष टनांवरून २५.८३ दशलक्ष टन राहणार अाहे, असा अंदाज  इंग्लंड येथील कॉटल आउटलुक या संस्थेने वर्तविला आहे. 

मुंबई ः भारत, आॅस्ट्रेलिया, पाकिस्तानच्या कापूस उत्पादनात घटीच्या परिणामामुळे जागतिक कापूस उत्पादनात घट होणार आहे. जागतिक कापूस उत्पादन २५.९७ दशलक्ष टनांवरून २५.८३ दशलक्ष टन राहणार अाहे, असा अंदाज  इंग्लंड येथील कॉटल आउटलुक या संस्थेने वर्तविला आहे. 

काॅटन आउटलुकने नुकताच जागतिक व्यापाराचा मासिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांमधील कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतात २०१७-१८ (ऑगस्ट ते जुलै) या वर्षात कापसाचे सुमारे ६.३८ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज इंग्लंड येथील कॉटल आउटलुक या संस्थेने वर्तविला आहे. या आधी प्रसिद्ध केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे उत्पादन कमी असून, याआधी देशात ६.४६ दशलक्ष टन उत्पादन झाले आहे.

या संस्थेने जागतिक स्तरावरील कापूस उत्पादनाचा अंदाज वर्तविला असून, या वर्षात जगभरात एकूण २५.८३ दशलक्ष टन कापसाचे उत्पादन होईल, असे मासिक अहवालात सांगण्यात आले आहे. याआधी जागतिक पातळीवर एकूण २५.९७ दशलक्ष टन कापसाचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भारतात काही ठिकाणी पडलेला दुष्काळ तसेच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाना, पंजाब या राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट आली आहे. परिणामी देशातील कापूस उत्पादनात यंदा सुमारे ८५ हजार टन उत्पादनाची घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियातदेखील हीच स्थिती असून, तेथे अनुक्रमे एक लाख आणि ७५ हजार टनाने कापूस उत्पादनात घटीचा अंदाज वर्तविण्यात आले आहे. तर अमेरिकेतील कापूस उत्पादन या वर्षी ३ हजार टनांनी वाढले असून, एकूण उत्पादन ४.६५ दशलक्ष टन घेण्यात आले.

कॉटन आउटलुक हे जागतिक स्तरावरील कापूस उत्पादन, मूल्य आणि त्या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने जागतिक स्तरावरील कापूससाठ्यासंदर्भातील माहिती अपडेट करण्यात आली आहे. तसेच कॉटन आउटलुकने जागतिक कापूस साठाही आता २ लाख ५८ हजार टनांवर पोचला अल्याचे नमूद केले आहे. आधीच्या अहवालात ७ लाख ८९ हजार टन जागतिक कापूससाठा असल्याचे नमूद केले होते. तसेच या संस्थेने जागतिक कापूसवापर हा २५.५७ दशलक्ष टन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. यापूर्वीच्या अहवालात जागतिक कापूसवापर २५.१८ दशलक्ष टन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. 

भारतात उत्पादन ८५ हजार टनांनी घटणार
काॅटन आउटलुकने प्रकाशित केलेल्या सुधारित अंदाजानुसार भारतात यंदा ६.३८ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे. या आधी ६.४६ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. सुधारित अंदाजात उत्पादनात यंदा सुमारे ८५ हजार टन उत्पादनाची घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानमध्ये एक लाख टन आणि ऑस्ट्रेलियात ७५ हजार टन उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त केला आहे.
 

जागतिक कापूस उत्पादन (दशलक्ष टनांत)
वर्ष उत्पादन
२०१०-११ २५.४५
२०११-१२ २७.८५ 
२०१२-१३ २६.७८ 
२०१३-१४ २६.१७
२०१४-१५ २६.२०
२०१५-१६ २१.०२
२०१६-१७ २२.४० 
स्रोत ः जागतिक कापूस सल्लागार समिती (आयसीएसी) 

 

इतर अॅग्रोमनी
सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कलएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा...
सरकारने साखर आयात केली नाही कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर...
दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लकजळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल...
गवार बी वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स...एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात हळद, गहू व हरभरा...
पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक...चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि...
कशी रोखणार पुरवठावाढ?शेतीमाल पुरवठावाढ ( Supply glut) ही मोठी ...
साखरेचा बफर स्टॉक न केल्यास अडचणी...पुणे : देशातील साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे...
एमार कंपनी महाराष्ट्रात अन्न...मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची...
मक्याच्या भावात घसरणया सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (८.६...
तीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळलाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या...
डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधीजळगाव : रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचे दर ६६ रुपये...
चीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधीनवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक...
सरासरी मॉन्सूनमुळे २८.३ दशलक्ष टन...नवी दिल्ली : चांगल्या मॉन्सूनच्या हजेरीच्या...
मका वगळता सर्व पिकांच्या भावात वाढया सप्ताहात हळद, गहू व गवार बी यांच्यातील किरकोळ...
भारतीय कापसाची सर्वाधिक आयात...जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
आंबा निर्यातीला सुरवातपुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी...
पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदीचंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४....
रब्बी मका, हळदीच्या भावात वाढया वर्षी सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय...
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणेच अधिक...शेतीवरील संकटाला तोंड देण्यासाठी भावांतर योजना...