जागतिक कापूस उत्पादनात घट होणार

कापूस उत्पादन आढावा
कापूस उत्पादन आढावा

मुंबई  ः जागतिक कापूस उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील कॉटन आऊटलुकने व्यक्त केला आहे. जागतिक कापूस उत्पादन २०१८-१९ या वर्षात घटून २६.१३ दशलक्ष टन होईल. २०१७-१८ च्या हंगामात जागतिक कापूस उत्पादन २६.१८ दशलक्ष टन झाले होते, असे कॉटन आऊटलूकने म्हटले आहे.  अमेरिकेतील कॉटन आऊटलूकने नुकताच २०१८-१९ या हंगामतील जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज नुकताच जाहीर केला. यामध्ये येणाऱ्या हंगामात जागतिक कापूस उत्पादन घटणार आहे. पुढील हंगामात कापूस लागवड वाढेल पण उत्पादकता ही २०१७-१८ मधील उत्पादकतेपेक्षा कमीच राहिल. तसेच जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक भारतातील कापूस उत्पादनात साधारण वाढ होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेतील कापूस उत्पादनात मागील हंगामातील उत्पादनापेक्षा ४.५१ दशलक्ष टन कमी उत्पादन होणार आहे, असे अहवालात म्हटले आहे. चीन हा जगात सर्वांत जास्त कापूस उपभोक्ता देश आहे. २०१८-१९ च्या हंगामात चीनमध्ये कापूस उत्पादनात ५.३७ दशलक्ष टनांपर्यंत घट येणार आहे. चीन सरकारने देशातील सुत उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा जास्त फायदा झिंजिआंग प्रांतातील गिरण्यांना होणार आहे. त्यामुळे येथील सुत गिरण्यांची कापसासाठीची मागणी वाढून जास्त कापूस उपभोग होईल. या वाढत्या मागणीने कापूस मागणीत २०१८-१९ मध्ये जवळपास ८.८ दशलक्ष टन कापसाची मागणी वाढेल, असेही अहवालात म्हटले आहे. २०१७-१८ च्या हंगामात चीनमध्ये नियोजन चुकल्याने उत्पादन घटले आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी चीनने साठ्यातील कापूस वापरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या २०१८-१९ च्या हंगामात चीनची मागणी वाढेल साठाही कमी होईल. जागतिक साठाही २०१८-१९ मध्ये ५ लाख ८३ हजार टनांपर्यंत कमी होईल, असे अहवालात म्हटले आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला संधी? अमेरिकेतील कॅाटन आऊटलुकने जाहीर केलेल्या अहवालात भारतात कापूस उत्पादन वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. त्यातच सर्वात मोठ्या उपभाेक्त्या चीनमध्ये उत्पादन घटणार आहे आणि येथील सुत गिरण्यांची कापसाची मागणी वाढणार आहे. त्यातच चीनचा संरक्षित साठाही यंदा कमी झाला असून चीन भारत आणि बांगलादेशाकडून कापूस आयात करत आहे. तसेच अमेरिकेतील कापूस उत्पादनातही घट होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात भारताला जास्त कापूस निर्यातीची संधी असणार आहे, असे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com