agriculture news in Marathi, World cotton production will up till 121 million bales | Agrowon

जागतिक कापूस १२१ दशलक्ष गाठींवर स्थिरावणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

वॉशिंग्टन, अमेरिका ः जागतिक कापूस उत्पादन २०१७-१८ हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढून १२१.३७ दशलक्ष गाठी (एक कापूस गाठ = १७० किलो) होईल. मागील वर्षी जागतिक कापूस उत्पादन १०६.५७ दशलक्ष गाठी झाले होते. यंदा जागतिक उत्पादन वाढणार असले, तरी भारतात पिकावर आलेल्या गुलाबी बोंड अळीमुळे उत्पादनात घट होणार आहे, असा सुधारित अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला आहे.

वॉशिंग्टन, अमेरिका ः जागतिक कापूस उत्पादन २०१७-१८ हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढून १२१.३७ दशलक्ष गाठी (एक कापूस गाठ = १७० किलो) होईल. मागील वर्षी जागतिक कापूस उत्पादन १०६.५७ दशलक्ष गाठी झाले होते. यंदा जागतिक उत्पादन वाढणार असले, तरी भारतात पिकावर आलेल्या गुलाबी बोंड अळीमुळे उत्पादनात घट होणार आहे, असा सुधारित अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला आहे.

‘यूएसडीए’ने नुकताच जागतिक कापूस उत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. सुधारित अंदाजात जागतिक कापूस उत्पादन वाढणार आहे. याआधी जाहीर केलेल्या अंदाजात जागितक कापूस उत्पादन १२०.९७ दशलक्ष गाठी होणार असल्याचे यूएसडीएने सांगितले होते. चीन आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये पिकाला पूरक स्थिती असल्याने येथील उत्पादन वाढणार आहे. चीनमध्ये या आधी २६.४० दशलक्ष गाठी उत्पादन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. आता मात्र त्यात वाढ होऊन २७.५० दशलक्ष गाठी उत्पादन होणार अाहे. तसेच ब्राझीलमध्ये याआधीच्या अंदाजात ७.८० दशलक्ष गाठी उत्पादन होणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु सुधारित अंदाजात उत्पादन वाढून ८ दशलक्ष टन गाठी उत्पादन होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

ब्राझीलचे उत्पादन वाढणार
ब्राझीलमध्ये यंदा लागवड जास्त झाल्याने कापूस उत्पादनात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात जाहीर केलेल्या अंदाजात देशात ७.८ दशलक्ष गाठी उत्पान होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलेल्या अंदाजात ०.२ दशलक्ष गाठी म्हणजेच ३ टक्के वाढ होऊन ८ दशलक्ष टन उत्पादन होईल. मागील वर्षीच्या तुलनेत १ दशलक्ष गाठी म्हणजेच १४ टक्के वाढ होणार आहे. मागील वर्षी ७ दशलक्ष गाठी उत्पादन झाले होते. देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १९ टक्के वाढ होऊन १.१ दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली आहे. तसेच उत्पादकता जानेवारी महिन्यात अंदाजित केलेल्या उत्पादकतेपेक्षा १ टक्का जास्त; मात्र मागील वर्षीच्या तुलनेत ४ टक्के घटली आहे.

आॅस्ट्रेलियातही माघारणार
यूएसडीएने जानेवारी महिन्यात आॅस्ट्रेलियात ४.६ दशलक्ष गाठी उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. त्यात आता घट करून ४.४ दशलक्ष गाठी उत्पादन होईल, असे सांगितले आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ९ टक्के जास्त असणार आहे. मागील वर्षी आॅस्ट्रेलियात ४.१ दशलक्ष गाठी उत्पादन झाले होते. देशात यंदा ०.४३५ दशलक्ष हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. आॅस्ट्रेलियात सिंचनावर आधारित कापूस उत्पादन जास्त घेतले जाते. तसेच देशातील उत्पादताही जास्त आहे. यूएसडीएने देशात यंदा हेक्टरी उत्पादकता २२०२ किलो राहील, असे सांगितले आहे. 

चीनमध्ये २१ टक्के वाढ
चीनमध्ये यंदा जास्त झालेली लागवड आणि पोषक वातावरणामुळे मागील वर्षाच्या तुलनेत विक्रमी २१ टक्के वाढ होऊन उत्पादन २७.५ दशलक्ष गाठी होणार आहे. चीनमध्ये कापूस लागवड क्षेत्रात यंदा १७ टक्के वाढ झाली आहे. यंदा एकूण ३.४ दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली होती. तसेच उत्पादकता मागील वर्षाच्या १७०८ किलोवरून यंदा १७६१ किलो प्रतिहेक्टर राहील, असे जाहीर केले आहे. चीनमधील सर्वच प्रांतांतील कापूस हंगाम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरपर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे, असे चीन कापूस असोसिएशिनने म्हटले आहे. देशातील सर्वच कापूस उत्पादक भागात यंदा पोषक वातावरण असल्याने चीनच्या कापूस उत्पादनात यंदा २१ टक्के वाढ होणार आहे, असे यूएसडीएने म्हटले आहे.

कापूस उत्पादन दृष्टिक्षेपात

  • जागतिक कापूस उत्पादन १२१.३७ दशलक्ष गाठी होणार
  • अमेरिकेत मागील वर्षीच्या १७.२ दशलक्ष गाठी उत्पादनाच्या तुलनेत यंदा २१.३ दशलक्ष गाठी उत्पादन होणार 
  • ब्राझीलमध्ये उत्पादन वाढून ८ दशलक्ष गाठीवर स्थिरावणार
  • भारतात बोंड अळीचा फटक्याने उत्पादन २८.५ दशलक्ष गाठी होणार
  • आॅस्ट्रेलियात घट होऊन ४.४ दशलक्ष गाठी उत्पादन होईल. 
  • चीनमध्ये उत्पादन २१ टक्क्यांनी वाढले
  • पाकिस्तानमध्ये मागील वर्षीच्या ७.७ दशलक्ष गाठींवरून ८.२ दशलक्ष गाठी उत्पादन होणार

भारतात बोंड अळीचा फटका
भारतात यंदा महाराष्ट्र, तलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. जानेवारी महिन्यात भारतात २९.३ दशलक्ष गाठी उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. त्यात आता घट करून २८.५ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे यूएसडीएने जाहीर केले आहे. मात्र तरीही २०१६-१७ च्या हंगामात झालेल्या २७ दशलक्ष गाठी उत्पादनाच्या तुलनेत यंदा वाढ होणार आहे. भारतात यंदा १२.३० दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली होती. मात्र महाराष्ट्र, तलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट आली आहे. व्यापारी सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात एकूण लागवडीच्या ४० टक्के क्षेत्रावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. तसेच तेलंगणा राज्यात केवळ पहिल्या वेचणीतलाच कापूस व्यवस्थित निघाला. मात्र गुजरातमध्ये यंदा बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवला नाही. 

कापूस उत्पादन ३६.७ दशलक्ष गाठी होणार ः ‘सीएआय’
देशात यंदा कापूस उत्पादन ३६.७ दशलक्ष गाठी होणार आहेत, असे भारतीय कापूस महामंडळाने जाहीर केले आहे. याआधी जाहीर केलेल्या अंदाजात २ टक्के घट करण्यात आली आहे. देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होणार आसल्याचे सीएआयने म्हटले आहे. तसेच देशातील कापूस स्टॉक हा ५ दशलक्ष गाठींवरून ४.२ दशलक्ष गाठी राहणार असल्याचेही सीएआयने म्हटले आहे.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...