agriculture news in marathi, world cotton stocks will drop, jalgaon, maharashtra | Agrowon

जागतिक कापूससाठा दहा टक्क्यांनी घटणार
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

सध्या कापसाचे सौदे सुरू आहेत. व्हिएतनाम व बांगलादेशसोबत हे सौदे सुरू आहेत. सुरवातीला मागणी कमी दिसत आहे. कापूस व्यापारक्षेत्राचे लक्ष अमेरिका व चीनमधील व्यापार युद्धावरच आहे. हे युद्ध थांबले तर आणखी चांगले परिणाम कापूस बाजारात दिसतील. महाराष्ट्रात कापसाचा पुरवठा कमी झाला आहे. कोरडवाहू कापसाचे पीक अनेक ठिकाणी हातचे गेल्याने हा पुरवठा पुढे आणखी कमी होईल.
- अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया.
 

जळगाव ः कापूस व्यापारक्षेत्रात कमी उत्पादनामुळे साठ्यासंबंधीची अडचण यंदा राहणार आहे. मागील हंगामाच्या तुलनेत जागतिक कापूससाठा १० टक्‍क्‍यांनी कमी होणार असून, जागतिक गरज यंदा तीन टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती कापूस बाजारपेठेतील विश्‍लेषक, जाणकारांनी दिली आहे.
विशेष म्हणजे जगातील सर्वांत मोठा वस्त्रोद्योगाचा डोलारा असलेल्या चीनमधील कापूससाठाही यंदा घटणार आहे. परिणामी कापसाचे दर टिकून राहतील, असे अपेक्षित आहे.

चीनने मार्च ते ऑगस्ट २०१८ यादरम्यान आपल्याकडील लिलावात दोन दशलक्ष मेट्रिक टन रुईची विक्री केली. २०१७-१८ मध्ये चीनचा कापूससाठा ८.६ दशलक्ष मेट्रिक टन होता. तर नुकत्याच सुरू झालेल्या कापूस हंगामात (२०१८-१९) चीनचा कापूससाठा ६.६ दशलक्ष मेट्रिक   टन असणार आहे. अर्थातच चीनमधील साठा मागील हंगामाच्या तुलनेत २३ टक्‍क्‍यांनी कमी राहणार आहे. २०११-१२ नंतर सर्वांत कमी कापूससाठा चीनमध्ये यंदा असणार आहे. चीनच्या कापूससाठ्यावरच जगातील साठ्याचे अंदाज बांधण्यात आले असून, जागतिक साठाही कमी असणार आहे.

अर्थातच चीनमध्ये आपल्या वस्त्रोद्योगाची गरज पूर्ण करण्यासाठी हवे तेवढे उत्पादन नसेल. चीन यंदा ८० ते ९० लाख गाठींची शिवाय सुताचीदेखील आयात करील, हेदेखील निश्‍चित आहे. सध्या सुताच्या आयातीसंबंधी चीनने सावध भूमिका घेतलेली असली तरी कापसाचा पुरवठा कमी असल्याचे लक्षात घेता तेथून आयातीसंबंधीचे सौदे सुरू होतील, असे संकेत मिळत आहेत. चीनमधील साठा कमी होत असला तरी चीनव्यतिरिक्त इतर ठिकाणी कापूससाठा काहीसा वाढेल.

२०१७-१८ मध्ये चीनव्यतिरिक्त इतर देशांचा कापूससाठा मिळून १०.१ दशलक्ष मेट्रिक टन एवढा होता. २०१८-१९ हा साठा १०.२ दशलक्ष मेट्रिक टन असण्याची शक्‍यता आहे. परंतु चीनचा साठा कमी होत असल्याने जागतिक साठ्यावरही त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे.
सरत्या हंगामात भारतातही कापूससाठा फक्त १८ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढाच राहिला. ऑगस्टनंतर निर्यातीसंबंधी फारसे सौदे झालेले नसले तरी स्थानिक बाजारात चांगली मागणी राहिली. सुमारे ७४ लाख गाठींची निर्यात सप्टेंबरअखेरपर्यंत झाली.

नव्या हंगामात बांगलादेश व व्हिएतनामसोबत सौदे होत आहेत. भारतीय खंडीला (३५६ किलो रुई) ४५,५०० रुपये असे दर सध्या मिळत आहेत. सुमारे दीड लाख गाठींचे सौदे बांगलादेश व व्हिएतनामसोबत अलीकडेच झाले आहेत. चीनकडून अजून फारसा उठाव नाही.
 

एक डॉलरसाठी पाकिस्तान मोजतोय १३४ रुपये
जगात अमेरिका वगळता सर्व देशांचे चलन डॉलरसमोर कमजोर होत आहे. आशियात चीनला अमेरिकेसोबतच्या व्यापारयुद्धाचा परिणाम सहन करावा लागत आहे. पाकिस्तानमध्ये एकाच दिवसात डॉलरचे दर आठ टक्‍क्‍यांनी वधारून ते १२६ रुपयांवरून १३४ रुपये प्रतिडॉलर झाले. बांगलादेशमधील टाका चलनही डॉलरसमोर कमकुवत असून, सुमारे ९२ टाकांमध्ये एक डॉलर मिळत आहे. भारतात रुपयाही कमजोर असून, एक डॉलरसाठी ७३.८० रुपये मोजावे लागत आहेत. डॉलर तेजीत असल्याने कापसाचे दर स्थिर आहेत.
 

कापूससाठ्याची स्थिती (दशलक्ष ः मेट्रिक टन)
घटक   २०१५-१६  २०१६-१७  २०१७-१८  २०१८-१९ (अपेक्षित)
जागतिक २०.३१  १८.७९ १८.७४   १६.९१
चीन  १२.६५   १०.६३   ८.५९  ६.६७
अमेरिका     ०.८२ ०.५९   ०.९७  ०.९७

 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...