agriculture news in marathi, world eggs day celebrate, pune, maharashtra | Agrowon

कौशल्य विकासातून पशुसखी, पशुमित्र योजना राबवणार ः पशुसंवर्धनमंत्री जानकर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पुणे   ः शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ भाजीपाला उत्पादनातून दुप्पट हाेणार नसून, उत्पन्न चाैपट करण्याची क्षमता पशुसंवर्धनात आहे. यासाठी प्रत्येक गावात पशुसखी आणि पशुमित्र याेजना राबविणार असल्याची घाेषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली. ही याेजना काैशल्य विकास याेजनेशी जाेडून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास कुक्कुट, शेळी, मेंढी आणि दुधाळ जनावरे पालनासाठी प्राेत्साहन दिले जाणार असून, आगामी वर्ष कुक्‍कुटपालन वर्ष म्हणून साजरे केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

पुणे   ः शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ भाजीपाला उत्पादनातून दुप्पट हाेणार नसून, उत्पन्न चाैपट करण्याची क्षमता पशुसंवर्धनात आहे. यासाठी प्रत्येक गावात पशुसखी आणि पशुमित्र याेजना राबविणार असल्याची घाेषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली. ही याेजना काैशल्य विकास याेजनेशी जाेडून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास कुक्कुट, शेळी, मेंढी आणि दुधाळ जनावरे पालनासाठी प्राेत्साहन दिले जाणार असून, आगामी वर्ष कुक्‍कुटपालन वर्ष म्हणून साजरे केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

पुणे येथे जागतिक अंडी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी (ता. १२) मंत्री जानकर बाेलत हाेते. या वेळी खासदार अमर साबळे, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, सहआयुक्त डॉ. डी. डी. परकाळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. एम. डी. चव्हाण, आहारतज्ज्ञ प्रा. गीता धर्माती, व्यंकटेश्वरा उद्याेग समूहाचे अधिकारी प्रसन्न पेडगांवकर आदी उपस्थित हाेते.

या वेळी मंत्री जानकर म्हणाले, की देशात उद्याेजक म्हटले तर केवळ अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, माेदी यांचीच नावे समाेर येतात. मात्र आता शेतकऱ्यांच्या मुलांना उद्याेजक बनविण्यासाठी दाेन वर्षांत १ हजार तरुणांना अंडी उत्पादन क्षेत्रात उभे करण्यासाठी पशुंसवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. राज्याची अंड्याची गरज तीन काेटींची असून, प्रत्यक्षात दीड काेटी अंडीच उपलब्ध हाेत आहे. उर्वरित दीड काेटी अंडी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून आणावी लागत आहे.

खुल्या गटातील अनेक तरुण, तरुणींचा कल सध्या शेती आणि पशुपालनाकडे वाढत आहे. मात्र त्यांच्यासाठी याेजनाच नसल्याने त्यांची निराशा हाेत आहे. या तरुण तरुणींना पशुपालन व्यवसायात आणण्यासाठी मुख्यमंत्री पशुपालन याेजना आखण्यात येत असल्याची माहिती मंत्री जानकर यांनी दिली. 

यावेळी खासदार साबळे म्हणाले, की जागतिक बाजारपेठेत अंडी आणि मांसाला मागणी वाढत आहे. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन इंडाे अरब फाेरम स्थापन करून, त्यांच्या माध्यमातून २८ अाखाती देशांमध्ये निर्यातीसाठी प्रयत्न करणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...