Agriculture News in Marathi, World Food India exhibition, conference held at New Delhi, India | Agrowon

दिल्लीत वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शन ३ नोव्हेंबरपासून
वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017
नवी दिल्ली ः केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड फूड इंडिया २०१७ प्रदर्शन अाणि परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंतवणूकदार, तज्ज्ञ सहभागी होत अाहेत. 
 
नवी दिल्ली ः केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड फूड इंडिया २०१७ प्रदर्शन अाणि परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंतवणूकदार, तज्ज्ञ सहभागी होत अाहेत. 
 
अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक अाणि व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनाचे अायोजन करण्यात अाले अाहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन ३ नोंव्हेबर रोजी होणार अाहे. या वेळी केंद्रीय अन्न प्रक्रियामंत्री हरसिरत कौर बादल उपस्थित राहणार अाहेत.  
 
तीन दिवसांच्या या प्रदर्शनात भारतासह २० देश सहभागी होत अाहेत. दोन हजारांहून अधिक प्रतिनिधींचा समावेश राहणार अाहे. विज्ञान भवनामध्ये अायोजित परिषदेत नऊ चर्चासत्रे होणार अाहेत. एक देश, एक अन्न कायदा, फळे, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, मत्स्योद्योग या क्षेत्रातील संधी, भारतातील पारंपरिक अन्न पदार्थांचे जागतिकीकरण अादी विषयांवरील चर्चासत्रात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार अाहेत.
 
वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शन
ठिकाण ः सी- हेक्सागन पार्क, इंडिया गेट, नवी दिल्ली
 
वर्ल्ड फूड इंडिया परिषद
ठिकाण ः विज्ञान भवन, नवी दिल्ली
 
प्रदर्शन, परिषदेविषयी अधिक माहिती ः https://www. worldfoodindia.in/ यावर उपलब्ध अाहे.
 
परिषदेतील प्रमुख वक्ते
इर्विन सिमॉन, अध्यक्ष, हेन सेलेस्टिअल इंक (अन्न प्रक्रिया उद्योग), न्यूयॉर्क, अमेरिका, कीम फाऊसिंग, अध्यक्ष, डनफॉस (शीतगृह साखळी उद्योग), डेनमार्क, युसूफ अली, अध्यक्ष, लूलू ग्रूप इंटरनॅशनल, अबूधाबी, पॉल बुल्के, अध्यक्ष, नेस्ले एस. ए. (फूड, बेव्हेरेज कंपनी), केन्नेथ पीटरसन, उपाध्यक्ष क्लालिटी ॲसुरन्स (मीट प्रोसेसर) अमेरिका, एसकेएम श्री शिवकुमार, सरव्यवस्थापक, एसकेएम एग प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट लिमिटेड (पोल्ट्री- एग प्रोसेसिंग).

इतर अॅग्रोमनी
नोंदी ठेवून करा शेतीचे नियोजनशेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी...
दुधावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना ‘...देशात दुधाचा पुरवठा वाढला असून केवळ दूध विकणाऱ्या...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...
धान्यांतील पुरवठा वाढ संतुलित होणार?केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १३ जुलैच्या...
सोयाबीन, कापूस, हळदीत घटएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व हळद वगळता...
सोयाबीन, कापूस अन् हळदीत घटएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात कापूस व हळद वगळता...
दुष्काळ, आपत्तीवर चेळकर कुटुंबीयांची...लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील चेळकर...
खतांच्या किमतीत २० टक्के वाढकच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे...
रुपयाची घसरण निर्यातीसाठी लाभदायीसध्या डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमजोर होऊन...
साखर कारखान्यांकडील थकीत रकमेत तीन हजार...केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलासा...
साखरेच्या दरात ३.५ टक्के वाढकेंद्र सरकारने साखर कारखान्यांना जुलै महिन्यात...
सोयाबीन, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात घटएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व हळद वगळता...
सोयाबीनच्या फ्युचर्स भावात घटएनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, मका व साखर...
सोयाबीनच्या फ्युचर्स भावात नरमाईएनसीडिएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, साखर, हळद,...
तूर उत्पादकांना दोन हजार बोनस न दिल्यास...अमरावती ः तुरीची शासकीय हमीभाव खरेदी सुरू करावी...
सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाहीदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर...
सीमाबंदीमुळे टोमॅटोचा लाल चिखलकेंद्रीय कृषी मंत्रालयाने ३० मे रोजी...
दूध दर कमी असतानाही मूल्यवर्धित...वाढता उत्पादन खर्च, तुलनेने कमी झालेले दूध दर...
सोयाबीन, मका, हरभऱ्यात नरमाई; साखर, हळद...एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व साखर वगळता...