डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८ चा जागतिक अन्न पुरस्कार

कुपोषण कमी होण्याचा वेग कमी आहे. अजीवनसत्त्वयुक्त आहारामुळे मधुमेह, अतिताण आणि लठ्ठपणासारखे परिणाम होतात आणि या तिन्ही परिणामुळे कुपोषितपणा येतो. याला कोणताही देश अपवाद नाही. - डॉ. लॉरेन्स हद्दाड, अर्थतज्ज्ञ
डॉ. हद्दाड आणि डॉ. नॅबार्रो
डॉ. हद्दाड आणि डॉ. नॅबार्रो

पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या अर्थतज्ज्ञ डॉ. लॉरेंन्स हद्दाड आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड नॅबार्रो यांना ‘जागतिक अन्न पुरस्कार-२०१८’ ने गौरविण्यात येणार आहे. डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांच्या नेतृत्वाखाली २०१२ ते २०१७ या काळात जगभरातील अतिकुपोषित बालकांची संख्या एक कोटीने कमी झाली आहे. कुपोषित माता आणि बालकांना चांगल्या गुणवत्तेचे आणि जीवनसत्त्वयुक्त अन्न उपलब्ध करून देण्यासाठी काम केले आहे.  जागतिक अन्न पुरस्कर प्रसिद्ध कृषितज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी सुरू केला. या पुरस्काराला ‘अन्न आणि कृषीचा नोबल पुरस्कार’ म्हणतात. पुरस्कार विजेत्यांना अडीच लाख डॉलरची राशी मिळते.  ‘‘जगात कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जागतिक पातळीवर अनेक संस्था कुपोषणावर काम करीत आहेत. डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांनी कुपोषमुक्तीसाठी केलेल्या कामाचा विलक्षण असा परिणाम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून आला आहे. डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांच्या नेतृत्वाखाली २०१२ ते २०१७ या काळात जगभरातील अतिकुपोषित बालकांची संख्या एक कोटीने कमी झाली आहे. त्यांनी माता आणि बालकांना पहिल्या एक दिवसात जीवनसत्त्वयुक्त अन्न देण्याची संकल्पानाही मांडली आहे. त्यांना ‘जागतिक अन्न पुरस्कार-२०१८’ ने गौरविण्यात येणार आहे,’’ जागतिक अन्न पुरस्काराचे अध्यक्ष केनेथ एम. क्वेन यांनी म्हटले आहे.  प्रतिक्रिया सध्या लाखो लोक कुपोषण मुक्तीसाठी अन्नपुरवठ्याच्या साखळीत काम करतात. स्थानिक पातळीवर जे लोक कुपोषण मुक्तीसाठी काम करत आहेत, तेच उद्याचे नेतृत्व करतील. - डॉ. डेव्हिड नॅबार्रो, भौतिकशास्त्रज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com