agriculture news in marathi, World Girl child Day, Gender equality, Pune, Maharashtra | Agrowon

लिंगभेद मानण्याची मनोवृत्ती बदलावी
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पहिल्या वेळी गर्भवती असलेल्या महिलांमध्ये काय होणार याची उत्सुकता असते; पण त्याचा ताण नसतो; मात्र दुसऱ्या वेळी मुलगा होईल, अशी कुटुंबाची अपेक्षा वाढलेली असते. त्याचा कळत-नकळत एक प्रकारचा दबाव गर्भवतीवर असतो.
- अनुपमा मोरे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या

पुणे ः ‘मुलगाच पाहिजे’चा कुटुंबातून होणारा पराकोटीचा आग्रहामुळे मुलगी नाकारण्याची मानसिकता समाजात वाढत असल्याचे दिसते. मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी सामाजिक मनोवृत्ती बदलण्याकरता जनजागृती हवीच; पण आता पुढे जाऊन लिंग निदान कायद्याची डॉक्‍टरांपुरती होणारी अंमलबजावणी आता गर्भवतीच्या कुटुंबीयांपर्यंत वाढविणे, ही काळाची गरज असल्याचा विचारही पुढे आला आहे.

जागतिक बालिका दिन आज (ता. २४) आहे. त्यानिमित्ताने मुलीच्या जन्माच्या स्वागताबद्दल वैद्यकीयतज्ज्ञ, मुलींचे पालक यांच्याशी साधलेल्या संवादातून ही माहिती पुढे आली. राज्यात दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष २०११ मध्ये जाहीर झालेल्या जनगणनेतून निघाला आहे. 
अद्यापही पुण्यासारख्या सुशिक्षितांची संख्या जास्त असलेल्या शहरामध्ये मुलगाच पाहिजे, असा दबाव गर्भवतीवर असतो. त्यातच, आधीची मुलगी असेल, तर कुटुंबातून होणारा मुलाचा ‘आग्रह’ अधिकच वाढलेला दिसतो, असे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचे निरीक्षण आहे. 

मुलगा की मुलगी, असे सांगण्याचा आग्रहदेखील गर्भवतीचे नातेवाईक करतात. २० आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नाही; पण त्यानंतरही गर्भपात करण्याचा हट्ट नातेवाईक धरतात. त्यामुळे एकीकडून कायद्याची भीती आणि दुसरीकडून नातेवाइकांचा दबाव, अशा कात्रीत वैद्यकीयतज्ज्ञ अडकले आहेत, असेही यातील तज्ज्ञांनी सांगितले. निर्भयाच्या घटनेनंतर मुलींना वाढविणे, ही मोठी जबाबदारी वाटते. यापूर्वी मुलगी नको, असा विचार कधी मनात डोकावत नव्हता; पण बदलत्या काळात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. अशी वेळी मुलगी समाजात किती सुरक्षित आहे, असा प्रश्‍न पडत असल्याचे मत एका लहान मुलीच्या आईने व्यक्त केले. 

कायद्याची कक्षा वाढवावी
गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या अंमलबजावणीमुळे उघड-उघड होणाऱ्या गर्भलिंग निदानाला आळा बसला आहे; पण अद्यापही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदानाची मागणी होते. अशा डॉक्‍टरांना कायद्याच्या जाळ्यात पकडण्याबरोबरच संबंधित गर्भवतीच्या कुटुंबीयांनाही शिक्षा झाली पाहिजे, असा सूर निघत आहे.

काय आहे पुण्यातील स्थिती?
शहरात २००१ मध्ये जन्मला येणाऱ्या दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण फक्त ८५७ होते. २००२ मध्ये ते ८४१ पर्यंत खाली घसरले. पुण्याच्या गेल्या सोळा वर्षांच्या इतिहासातील हा सर्वांत कमी जन्मदर ठरला. २०११ पर्यंत हे लिंग गुणोत्तर ८८४ पर्यंत वाढले होते. २०१२ नंतर ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने हे प्रमाण ९३४ पर्यंत वाढले. २०१३ मध्ये गुणोत्तर उच्चांकी म्हणजे ९३७ झाल्याची नोंद महापालिकेच्या दफ्तरी झाली; पण २०१५ मध्ये ९२६ तर, २०१६ मध्ये ९३४ झाले. यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या विश्‍लेषणावरून हे प्रमाण ९०९ पर्यंत खाली आल्याचा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. 

वर्ष जन्मलेली मुले जन्मलेल्या मुली लिंग गुणोत्तर 
२०१६ २८,४७९ २६,६०२ ९३४
२०१५ २८,३४० २६,२३९ ९२६
२०१४ २७,८४३ २६,०९५ ९३१
२०१३ २८,७७२ २६,८३१ ९३३
(स्रोत ः आरोग्य विभाग, पुणे महापालिका)

 

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...