agriculture news in Marathi, World oil seed production will decrease, Maharashtra | Agrowon

जागतिक तेलबिया उत्पादन घटणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

मुंबई  ः जानेवारी महिन्यात जागतिक तेलबिया उत्पादन ५८०.०८ दशलक्ष टन होणार असल्याचे अंदाज होता. मात्र जगभरात तेलबिया पिकांवर आलेल्या संकटांमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे २०१७-१८ वर्षात जागात तेलबिया उत्पादन कमी होऊन ५७८.६२ दशलक्ष टन होणार आहे, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) नुकताच जाहीर केला आहे. 

मुंबई  ः जानेवारी महिन्यात जागतिक तेलबिया उत्पादन ५८०.०८ दशलक्ष टन होणार असल्याचे अंदाज होता. मात्र जगभरात तेलबिया पिकांवर आलेल्या संकटांमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे २०१७-१८ वर्षात जागात तेलबिया उत्पादन कमी होऊन ५७८.६२ दशलक्ष टन होणार आहे, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) नुकताच जाहीर केला आहे. 

जागतिक सोयाबीन उत्पादनातही घट होणार आहे. जानेवारी महिन्यात सोयाबीन उत्पादन ३४८.५७ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज होता. मात्र सुधारित अंदाजात महत्त्वाच्या उत्पादक देशांमध्ये पिकाला फटका बसल्याने उत्पादन घटले आहे, त्यामुळे यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन ३४६.९२ दशलक्ष टन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना हे जागातील आघाडीचे सोयाबीन उत्पादक देश आहेत. चालू हंगामात अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादन घटणार असून, ब्राझीलमध्ये उत्पादन वाढेल. अर्जेंटिनामध्ये पेरणी कमी झाली आणि कमी पाऊस व पावसाच्या ओढीने उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आधीच्या ५६ दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत ५४ दशलक्ष टन उत्पादन होईल. ब्राझीलमध्ये पूरक मॉन्सून आणि वाढलेली पेरणी, तसेच चांगली उत्पादकता यामुळे यंदा उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या ११० दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत ११२ दशलक्ष टन उत्पादन होईल, असा अंदाज ‘यूएसडीए’ने व्यक्त केला आहे.

सायबीन निर्यातीचा विचार करता अमेरिकेच्या निर्यातीत मागील तीन महिन्यांत सतत घट झाली आहे. मागील महिन्यात अमेरिकेतून ५८.७९ लाख टन निर्यात झाली होती. ती चालू महिन्यात कमी होऊन ५७.१५ दशलक्ष टन झाली आहे. मात्र ब्राझीलच्या सोयाबीन निर्यातीत वाढ झाली आहे. ब्राझीलमधून मागील महिन्यात ६७ दशलक्ष टन निर्यात झाली होती. तुलनेत चालू महिन्यात ६९ दशलक्ष टन निर्यात झाली आहे. तर जागतिक सायोबीन आयातीत १५०.१७ दशलक्ष टनांवरुन १५०.२४ दशलक्ष वाढ झाली आहे. साेयाबीन जागतिक साठाही ९८.५७ दशलक्ष टनांवरून ९८.१४ दशलक्ष टनांवर आला आहे. तर अमेरिका साठा १२.७९ दशलक्ष टनांवरून १४.४२ दशलक्ष टनापर्यंत वाढला आहे. 

जागतिक तेलबिया साठा अर्जेंटिना, बोलाविया, पेरू आणि भारतात उत्पादन घटल्याने कमी झाला आहे. तर अमेरिकेत पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढल्याने जास्त झाला आहे, असेही ‘यूएसडीए’ने अहवालात म्हटले आहे. 

सोयाबीन उत्पादन ८ दशलक्ष टनांवर स्थिरावणार ः ‘एसईए’
देशात २०१७-१८ मध्ये सुरवातीला ९ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचा आंदाज व्यक्त केला होता. मात्र सुधारित अंदाजात सोयाबीन उत्पादन ८ दशलक्ष टन होणार आहे, असल्याचे सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर्स असोसिएशनचे (एसईए) कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी जाहीर केले आहे. मेहता म्हणाले, की देशात यंदा सुरवातीला जाहीर केलेल्या अंदाजपेक्षा कमी उत्पादन होणार आहे. मागील वर्षी ९.५ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. देशात झालेला असमान व कमी पाऊस आणि इतर नैसर्गिक अपत्तींमुळे पिकाला फटका बसला आहे. २०१७-१८ मध्ये सोयाबीनची १०.५ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली होती. ही पेरणी मागील वर्षाच्या तुलनेत ८.२ टक्क्यांनी कमी होती. तर क्रमांक एकच्या मध्य प्रदेश राज्यात यंदा पेरणी कमी झाली होती. मागील वर्षी या राज्यात ५.४० दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली होती, परंतु यंदा ५.०१ दशलक्ष हेक्टरवरच पेरा झाला होता. त्यामुळे देशातील उत्पादनावर परिणाम झाला आहे.

भारतात ८.३५ दशलक्ष टन उत्पादन होणार ः सोपा
देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये उत्पादन कमी झाल्याने २०१७-१८ मध्ये देशात सोयाबीन उत्पादन ८.३५ दशलक्ष टन होणार आहे, असा सुधारित अंदाज ‘सोपा’ने व्यक्त केला आहे. याआधी सोपाने देशात ९.१५ दशलक्ष टन उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. सोपाने मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांतील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले आणि त्यानंतर उत्पादन घटीचा अंदाज जाहिर केला आहे. उत्पादनात आघाडीच्या मध्य प्रदेशात २०१७-१८ मध्ये आधी ५.४ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यात घट होऊन ४.२ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे. महाराष्ट्रात सोपाने या आधी ३.६ दशलक्ष टन उत्पादन होईल असे जाहीर केले होते. या अंदाजात घट करून आता २.९ दशलक्ष टन उत्पादन होईल असे जाहीर केले आहे. राजस्थानमध्ये ९ लाख ८१ हजार टन उत्पादनाचा अंदाज होता त्यात आता घट होऊन ७ लाख ५० हजार टन उत्पादन होईल, असे जाहीर केले आहे.

तेलबिया उत्पादन दृष्टिक्षेपात

  • जगात तेलबिया उत्पादन ५७८.६२ दशलक्ष टन होणार.
  • अर्जेंटिना, बोलाविया, पेरू आणि भारतात सोयाबीन उत्पादन घटले. 
  • पोषक वातावरणामुळे अमेरिकेत उत्पादनात वाढ
  • सोयाबीन ३४७ दशलक्ष टनांवर स्थिरावणार.
  • ब्राझीलमध्ये ११२ दशलक्ष टन, तर अर्जेंटिनात ५४ दशलक्ष टन उत्पादन होणार.
  • जागतिक साेयाबीन साठा ९८.१४ दशलक्ष टनांवर
  • जागतिक आयात वाढून १५०.२४ दशलक्ष टन झाली.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...