कृषी, डेअरी, पशुधन, मत्स्य क्षेत्रात गुंतवणूक करा

केंद्रीय कृषिमंत्री सिंह यांचे जागतिक नेते, गुंतवणूकदारांना आवाहन
केंद्रीय कृषिमंत्री सिंह यांचे जागतिक नेते, गुंतवणूकदारांना आवाहन

नवी दिल्ली : भारतात कृषी, डेअरी, पशुधन आणि मत्स्य क्षेत्रात मोठी संधी आहे. याचा लाभ घेण्यासाठी जागतिक गुंतवणूकदारांनी देशातील या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी (ता. 4) केले.  येथे आयोजित फूड इंडिया 2017 कार्यक्रमात कृषिमंत्री म्हणाले, की सरकारद्वारे कृषी, शेतीपूरक आणि या संदर्भातील निगडित क्षेत्रांसाठी विविध कार्यक्रम राबवित आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढविल्यास शेतकऱ्यांसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी ते पूरक ठरेल.  एकेकाळी धान्योत्पादनात मोठी अडचण असलेल्या या देशाने आता निर्यातही सुरू केली आहे. जागतिक पातळीवर आता देश दुग्धोत्पादनात प्रथम क्रमांकावर, फळे आणि भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर, मत्स्योत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर तर अंडी उत्पादनात पाचव्या क्रमांकावर आहे. देशातील वैविध्यपूर्ण परिस्थिती, विविध पिके, उपलब्ध मनुष्यबळ आणि सोपी कररचना आणि सरकारी धोरणे यामुळे भारत हा गुंतवणुकीस योग्य देश आहे. जागतिक पातळीवर याची दखल घेऊन गुंतवणूक वाढवावी, असे सिंह यांनी म्हटले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com