agriculture news in marathi, wrong move to close agri technical diploma course says Vikhe Patil | Agrowon

कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम बंदचा निर्णय तुघलकी : विखेे
वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शासनाला अंधारात ठेवून कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा घेतलेला निर्णय तुघलकी आहे. तो तातडीने रद्द करून कुलगुरूंविरुद्ध कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शासनाला अंधारात ठेवून कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा घेतलेला निर्णय तुघलकी आहे. तो तातडीने रद्द करून कुलगुरूंविरुद्ध कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

विखे पाटील यांनी यासंदर्भात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, कृषी तंत्रज्ञान पदविका हा ३ वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याबाबत शासन स्‍तरावर कोणताही निर्णय झाला नसताना राहुरी विद्यापीठाने सर्व नियम, कायदे आणि मार्गदर्शक सूचना डावलून २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे. शासनाला अभ्‍यासक्रमात बदल करण्‍याचे अधिकार आहेत. परंतु, राहुरी विद्यापीठाने संबंधितांना विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेतल्याचेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

२०१२ मध्ये कुलगुरूंच्‍या संमतीने अतिशय विचारपूर्वक ३ वर्ष कालावधीच्‍या अभ्‍यासक्रमाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता व त्यास कुलपतींनी मान्‍यताही दिली होती. या अभ्‍यासक्रमामुळे ग्रामीण भागातील कृषी शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. मात्र राहुरीच्या महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने कुलपती व शासनाला अंधारात ठेवून हा ३ वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागाचे नुकसान होणार आहे. शासनाकडून कौशल्य विकासाचे ढोल बडवले जात असताना कृषी क्षेत्रातील कौशल्य विकसित करणारा हा अभ्यासक्रम बंद करून संबंधित कुलगुरूंनी शासनाच्या धोरणाला छेद दिल्याचेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

केंद्र आणि राज्‍य सरकारकडून कृषी विस्‍ताराच्‍या प्रचार आणि प्रसारासाठी अर्थसंकल्‍पात आर्थिक तरतूद केली जाते. या पार्श्‍वभूमिवर या निधीचा योग्य वापर करून विद्यार्थ्‍यांना बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी शिक्षण उपलब्‍ध करून देणे ही व्‍यवस्‍थेची जबाबदारी आहे. या अनुषंगाने आघाडी सरकारमध्‍ये कृषिमंत्री असताना आपण या अभ्‍यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र, कृषी तंत्रज्ञानाचा पाया भक्‍कम करण्‍याऐवजी त्‍यासंदर्भातील शिक्षणच बंद करण्‍याचा कृषी विद्यापीठाचा निर्णय शेतीसाठी धोकादायक ठरणार असल्‍याचेही विखे पाटील म्हणाले. 

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...