कापूस उत्पादकांना जागतिक व्यापारात उतरण्याची संधी

कापूस उत्पादकांना जागतिक व्यापारात उतरण्याची संधी
कापूस उत्पादकांना जागतिक व्यापारात उतरण्याची संधी

ब्युनॉर्स अायर्स, अर्जेंटिना : येथे सुरू असलेल्या जागतिक मंत्री परिषदेत वर्ल्ड ट्रेड अाॅर्गनायझेशन (डब्ल्यूटीअो) अाणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर (अायटीसी) यांच्यातर्फे कापूस पोर्टलचे नुकतेच उदघाटन करण्यात अाले.

कापूस उत्पादक, व्यापारी, धोरणकर्ते अादींना कापूस व्यापार क्षेत्रातील रोजच्या व्यवहाराची माहिती उपलब्ध व्हावी. या व्यापारात पारदर्शकता यावी, या उद्देशाने कापूस पोर्टल सुरू करण्यात अाले अाहे. तसेच यामुळे कापूस उत्पादकांचे विकासाचे उद्दिष्ट्य पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अाशा ‘डब्ल्यूटीअो’चे महासंचालक रॉर्बर्टो अाझावेदो यांनी या वेळी व्यक्त केली.

कापूस पोर्टलमुळे कापूस उत्पादक अाणि व्यापाऱ्यांना जागतिक व्यापारात उतरण्याची संधी मिळेल. तसेच निर्यातीला चालना मिळून चांगले मूल्य मिळेल, असे अायटीसीचे कार्यकारी संचालक अरंछा गोन्झालेझ यांनी म्हटले अाहे. निर्यात अनुदान काढून टाकणे, स्थानिक बाजारात फेररचना करणे तसेच कमी विकसित देशांना कापूस बाजार उपलब्ध करण्याबाबत नैरोेबी येथे २०१५ मध्ये मंत्रिस्तरीय निर्णय घेण्यात अाला होता. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून कापूस पोर्टलची सुविधा उपलब्ध करण्यात अाल्याचे मंत्रिपरिषदेत स्पष्ट करण्यात अाले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com