देशातून सुताची निर्यात वाढली

सुताची निर्यात यंदा वाढेल. कारण तीन टक्के अधिक सुताची मागणी आहे. चीन हा आशियातील सर्वांत मोठा सूत खरेदीदार म्हणून पुढे येत आहे. बांगलादेश व इतर देश चीनची सुताची गरज पूर्ण करू शकत नाही. भारताशिवाय चीनला सद्यःस्थितीत दुसरा चांगला पर्याय सुतासंबंधी नाही, असे मला वाटते. - दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार
सुत
सुत

जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांची कापसाची गरज यंदा फेब्रुवारीनंतर वाढून ती प्रतिमाह साडेसत्तावीस लाख गाठींपर्यंत पोचली आहे. जगात यंदा सुताची तीन टक्के गरज अधिक आहे. देशातील सूतगिरण्यांना निर्यातीची मोठी संधी यंदा मिळाली असून, दर महिन्याला देशातून दीड लाख टन सुताची निर्यात आशियाई देशांमध्ये होत आहे. तर जवळपास ४३ लाख मेट्रिक सूत भारतात उत्पादन होईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.  सूतगिरण्यांसह जिनींगचा हंगाम खऱ्या अर्थाने नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. तो यंदा सुरवातीला गुलाबी बोंड अळीने रखडत सुरू झाला होता. जागतिक कापूस उत्पादनात किमान १० टक्के वाढ दिसत असली, तरी चीन व भारतीय जिनींग व सूत गिरण्यांना यंदा अधिक कापूस व सूत लागत आहे. देशांतील सुमारे २४०० सूतगिरण्यांना दर महिन्याला साडेसत्तावीस लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) गरज भासू लागली आहे.  देशात न पिकणाऱ्या ३५ मिलीमीटर लांब धाग्याच्या कापूस गाठींची सुमारे २१ लाख गाठींची आयात दाक्षिणात्य सूतगिरण्यांसह गुजराती गिरण्यांनी केली आहे. आगामी शाळांचे शैक्षणिक वर्ष व सध्याची लग्नसराई यांमुळे कापडाची मागणी वाढली असून, उत्तरेकडील कापड गिरण्या १०० टक्के क्षमतेने सुरू आहेत. तर दाक्षिणात्य भागातील कापड गिरण्यांमध्ये ब्रॅण्डेड कापडाचे उत्पादनही पूर्ण क्षमतेने सुरू आहे.   मार्चध्ये चीनने शांघाय येथे सूत, कापड गिरणी चालक, मालकांसाठी चायना फेअर आयोजित करून या फेअरमध्ये भारतीय गिरण्यांकडून सुमारे तीन लाख टन सुताची आयात करण्याची तयारी दाखविली होती. त्यातच अमेरिका व चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू झाल्याने भारतीय, पाकिस्तान  व बांगलादेशी सूतगिरण्यांकडून चीनने सूत आयातीचा धडाका लावला आहे. सुताचे १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आलेले दर सात रुपयांनी वधारले आहेत. भारतीय पंचतारांकित सूतगिरण्यांच्या सुताला किलोमागे तीन रुपये प्रीमियमही मिळू लागला आहे.  बांगलादेशकडून रुईची आयात अधिक भारतातून आतापर्यंत सुमारे ४९ लाख गाठींची निर्यात विविध देशांमध्ये झाली आहे. सुरवातीला फक्त ५४ ते ५६ लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज होता. यंदा हंगामाच्या अखेरपर्यंत (३० सप्टेंबर, २०१८) ६८ लाख गाठी एवढी निर्यात होईल, असा नवा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. यातील सुमारे २५ ते २८ लाख गाठींची आयात एकटा बांगलादेश करील, असे संकेत आहेत. बांगलादेशने भारतातून सुमारे १४ लाख गाठींची आयात करून घेतली आहे.  चीनची आयात सुरू डॉलर रुपयाच्या तुलनेत मजबूत झाला असून, तो ६५ रुपये ३१ पैशांपर्यंत आहे. यामुळे चीनला भारतातून सुताची आयात परवडत असून, साडेतीन डॉलरमध्ये एक किलो सूत चीनला मिळत आहे.  आकडे दृष्टिक्षेपात साडेसत्तावीस लाख गाठी दर महिन्याला देशांतर्गत सूतगिरण्यांना गरज तीन लाख ५६ हजार मेट्रिक टन प्रतिमाह देशांतर्गत सूतगिरण्यांमध्ये सुताचे उत्पादन दीड लाख मेट्रिक टन सुताची प्रतिमाह आशियाई देशांमध्ये भारतातून निर्यात दोन लाख मेट्रिक टन सुताची देशांतर्गत कापड मिलांना गरज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com