agriculture news in Marathi, yarn industry in trouble due to electricity rate increased, Maharashtra | Agrowon

संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा पुन्हा ‘शाॅक’
राजकुमार चौगुले
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

सुतगिरण्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने वस्त्रोद्योग महामंडळाच्या माध्यमातून आम्ही सरकारविरोधात आंदोलन छेडणार आहोत. सुतगिरण्या बंद ठेवून प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा आमचा विचार आहे. 
- अशोक माने, अध्यक्ष दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार, शिरोळ मागासवर्गीय सुतगिरणी तमदलगे

कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा उगारल्याने प्रत्येक सूतगिरणीला महिन्याला दहा ते बारा लाख रुपयांचा फटका बसत आहे. यामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या सूतगिरण्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्य शासनाने वीजदरात युनिटला सहकारी सूतगिरण्यांना ३ रुपये, खासगी गिरण्यांना २ रुपये आणि यंत्रमाग कारखान्यांना एक रुपये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला. तो अमलात येण्याअगोदरच सप्टेंबरमध्ये एक ते दीड रुपयाची वाढ केली आहे.

सूतगिरण्यांना बाजार व सरकारी निर्णय या दोन्ही पातळीवर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारला या प्रश्‍नी गांभीर्य नसल्याने सूतगिरण्या आता उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या मानसिकतेत आहेत. याबाबतीत पुढील आंदोलनाचा लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. 

राज्यात १३० सहकारी तर ९४ खासगी सूतगिरण्या आहेत. सुताला अपेक्षित किंमत मिळत नसल्याने सूतगिरण्यांचा तोटा वाढत आहे. या अडचणी सूतगिरण्यांनी मांडल्यानंतर यंत्रमाग, प्रक्रिया गारमेंट,  होजिअरी प्रकल्पांच्या वीज दरात दोन रुपये सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु या निर्णयला सहा महिने झाले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. सवलत मिळण्याची कार्यवाही प्रलंबित असताना आता सप्टेंबर महिन्यात विजेच्या दरात युनिटला एक ते दीड रुपयाची वाढ झाली आहे. बाजारात कापडाला मागणी नसल्याने माफक प्रमाणात कापूस, सूत, कापड खरेदी होत असून वस्त्रोद्योगाचे वेळापत्रकच कोलमडल्याची स्थिती निर्माण झाल्याचे सूतगिरण्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

सूतगिरण्यांच्या अडचणीत वाढ

  • बाजारात सूताला मागणीच नाही
  • उत्पादन खर्चात १८ टक्के वाढ
  • गेल्या काही दिवसात पन्नास रुपयांनी दर उतरले.
  • लांब धाग्याच्या रुईचे दर उच्चांकी पातळीवर 
  • ३७० कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीची अंमलबजावणी नाही 
  • पंचवीस हजार चात्यांच्या सूतगिरणीला दर महा १० ते १२ लाख रुपयांचा बोजा पडणार

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...