agriculture news in marathi, yashvant sinhas farmer agitation | Agrowon

तोडगा निघत नसल्याने आंदोलन चिघळणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 डिसेंबर 2017

अकोला : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार(ता. ४)पासून सुरू झालेले यशवंत सिन्हा व सहकाऱ्यांचे अांदोलन दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ५) कायम होते. अांदोलनाचा काळ जसजसा वाढतो अाहे, तसतशी विविध राजकीय पक्षांकडून अांदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चढाअोढही सुरू झाली अाहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दुपारी जिल्हाधिकारी व जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कुठल्याही निर्णयाशिवाय संपली. तोडगा निघत नसल्याने अांदोलन चिघळण्याची शक्यता वाढली अाहे.

अकोला : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार(ता. ४)पासून सुरू झालेले यशवंत सिन्हा व सहकाऱ्यांचे अांदोलन दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ५) कायम होते. अांदोलनाचा काळ जसजसा वाढतो अाहे, तसतशी विविध राजकीय पक्षांकडून अांदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चढाअोढही सुरू झाली अाहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दुपारी जिल्हाधिकारी व जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कुठल्याही निर्णयाशिवाय संपली. तोडगा निघत नसल्याने अांदोलन चिघळण्याची शक्यता वाढली अाहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, सावकारी कर्जमुक्ती, नाफेडकडून संपूर्ण शेतमालाची खरेदी, बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, कृषिपंपाचे वीज कनेक्शन न तोडणे, भावांतर योजना लागू करावी अादी मागण्यांसाठी सोमवारी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच ठिय्या देणाऱ्यांना सायंकाळी पोलिसांनी मुख्यालयात स्थानबद्ध केले. रात्री हे अांदोलन मागे घेण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न झाले. मात्र तोडगा न निघाल्याने यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे, मनोज तायडे यांच्यासह शेकडोंनी पोलिस मुख्यालयातच मुक्काम केला. मंगळवारी सकाळी या अांदोलनाला पुन्हा उर्जिवस्था मिळाली. सकाळपासून या अांदोलनात सहभागी होण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी शेतकरी, विविध राजकीय पक्षांचे पुढारी गर्दी करू लागले. दुपारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर गर्दीने उच्चांक गाठला.

या कार्यकर्त्यांशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी अापल्या प्रत्येक मागणीवर तोडगा मिळेपर्यंत अाता हे मैदान सोडणार नाही. कितीही दिवस अांदोलन करावे लागले तरी मागे जाणार नसल्याचे सांगत त्यांनी अांदोलकांमध्ये चैतन्य निर्माण केले. रविकांत तुपकर यांनीही अांदोलनाचा शेवट हा शेतकऱ्यांच्या मागण्या सुटतील तेव्हाच होईल, असे जाहीर केले.

दुपारी खासदार नाना पटोले हेसुद्धा आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी यावेळी बोलताना केंद्र व राज्यातील सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून हल्ला केला. पक्षभेद विसरून सर्व एकत्र अाले तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, असे सांगत त्यांनी सर्वांना या ठिकाणी सहभागी होण्याचे अावाहन केले. शेतकऱ्यांच्या मागण्या या रास्त असून कुठल्याही सरकारला सोडविणे सहज शक्य अाहे.
सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करीत नसल्याचे सांगत त्यांनी हल्लाबोल केला. पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना केवळ लुटले. मी या विषयावर पंतप्रधानांसमोर बोललो तर माझा विरोध करण्यात अाला, असे सांगत पटोले यांनी सध्याचे हे सरकार ‘गरिबां’चे म्हणजे गौतम अदानी, रिलायन्स, बाबा (रामदेव) यांच्यासाठी काम करते, असेही सांगितले. अापणही मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे पटोले यांनी सांगितले. या अांदोलनात लवकरच अामदार बच्चू कडू सहभागी होणार अाहेत.

विरोधकांकडून अांदोलनाला पाठिंबा
भाजपचे नेते तथा माजी अर्थमंत्री असलेल्या यशवंत सिन्हा यांनी अकोल्यातील पोलिस मुख्यालयात सहकाऱ्यांसह अांदोलन सुरू केल्याने अकोला जिल्हाच नव्हे तर अाता राज्य व देशाचेही लक्ष वेधले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अांदोलकांशी संपर्क साधून पाठिंबा दिला. तर मंगळवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे सांगितले जात अाहे. तर जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाने पाठिंबा देत ठिकठिकाणी रास्ता रोको केला. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला. स्थानिक नेत्यांमध्ये कॉंग्रेसचे माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, साजीद खान पठाण, प्रकाश तायडे, शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, राजेश मिश्रा, भारिप बमसंचे माजी आमदार हरिदास भदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. याशिवाय अाम अादमी पक्षाचे कार्यकर्ते विविध भागातून येथे दाखल होत अाहेत. भाजप वगळता सर्वच पक्षांचे, संघटनांचे नेते पोलिस मुख्यालयाकडे ये-जा करीत अाहेत.

प्रशासनाची पळापळ
अांदोलनाचा कालावधी वाढत चालल्याने प्रशासनाची गोची झाली अाहे. जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय, त्यांचे सहकारी हे सातत्याने अांदोलकांशी चर्चा करीत अाहेत. मात्र मागण्यांवर तोडगा द्या, तरच अांदोलन मागे घेऊ, असे अांदोलकांकडून सांगितले जात अाहे. तर प्रशासन हे अापल्या स्तरावरील मागण्या तातडीने सोडविल्या जातील. राज्य व केंद्र स्तरावरील मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे सांगत अाहे. त्यामुळे कुठलाही तोडगा सायंकाळपर्यंत निघाला नव्हता. प्रशासनावरील ताण वाढत चालला अाहे.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...