agriculture news in Marathi, yashwant sinha, agitation | Agrowon

...तर अाता येथून परत जाणार नाही ः यशवंत सिन्हा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाला जागर मंचाने ४८ दिवसांपूर्वी निवेदन दिले होते, त्यावर काय कारवाई केली हे शासनाने सांगावे. अद्याप अामच्या एकाही मागणीवर ठोस कार्यवाही झाली नाही. प्रशासन, शासन जर कुठलीही ठोस भूमिका जाहीर करणार नसेल तर अाता येथून परत जाणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी येथे दिला.

अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाला जागर मंचाने ४८ दिवसांपूर्वी निवेदन दिले होते, त्यावर काय कारवाई केली हे शासनाने सांगावे. अद्याप अामच्या एकाही मागणीवर ठोस कार्यवाही झाली नाही. प्रशासन, शासन जर कुठलीही ठोस भूमिका जाहीर करणार नसेल तर अाता येथून परत जाणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी येथे दिला.

शेतमालाला योग्य भाव, हमीभावाने संपूर्ण शेतमालाची खरेदी, भावांतर योजना यांसह विविध शेतकरी प्रश्नांबाबत शासनाला जाब विचारण्यासाठी सोमवारी (ता. ४) माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून ठिय्या अांदोलन करण्यात अाले.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, महादेवराव भुईभार, मनोज तायडे, प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, श्रीकांत पिसे यांची उपस्थिती होती.

रविवारी (ता. ३) येथे कापूस- सोयाबीन- धान परिषद झाली. या वेळी सोमवारच्या अांदोलनाची व मागण्या पूर्ण होईपर्यंत अकोला न सोडण्याची घोषणा यशवंत सिन्हा यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी येथील गांधी- जवाहर बागेतून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात अाला.

मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी काही अंतरावर अडविल्याने श्री. सिन्हा यांच्यासह तुपकर व शेतकऱ्यांनी जागेवरच ठिय्या सुरू केला. जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः अांदोलनस्थळी येऊन चर्चा करून अाश्वासन देत नाहीत, तोवर अांदोलन मागे न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात अाला. मोर्चात अालेले शेतकरी जागेवर ठाण मांडून बसले. त्यानंतर पोलिसांनी यशवंत सिन्हा आणि रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली.

या वेळी श्री. सिन्हा म्हणाले, की ४८ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाला जागर मंचाने निवेदन दिले होते. रविवारी झालेल्या सोयाबीन- कापूस- धान परिषदेत नऊ ठराव मंजूर केले अाहेत. प्रशासन, शासन जर कुठलीही ठोस भूमिका जाहीर करणार नसेल, तर अाता येथून परत जाणार नाही. अाम्ही मागण्यांबाबत हातात ठोस काही घेऊनच मागे जाऊ. अाम्ही चर्चेसाठी येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन शेतकऱ्यांसोबत व सर्वांसमोर चर्चा करावी, तरच हा लढा मागे जाईल. अन्यथा जोपर्यंत तुम्ही ताणत राहाल तोवर लढा सुरूच ठेवू.

अाज या भागातील कापूस उत्पादक बोंड अळीच्या संकटामुळे अडचणीत अाला अाहे. सकाळी एका गावात जाऊन कपाशीची पाहणी केली, त्या वेळी शेतकऱ्यांनी गावात कुणीही अधिकारी अाला नसल्याचे सांगितले. बोंड अळीने अक्षरशः पीक हातातून हिरावून घेतले. जर प्रशासन गंभीर नसेल तर शेतकऱ्यांनी न्याय मागावा तरी कुणाला, असाही प्रश्न सिन्हा यांनी उपस्थित करीत शेतकऱ्यांचा हा लढा देशभर पोचेल असा इशारा दिला. 

तुपकर यांनीही अाता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मागे हटणार नसल्याचे सांगितले. शेतकरी त्यांच्या हक्काचे दाम मागत अाहे. ही लढाई अाता पदरात पाडून घेईपर्यंत सुटणार नाही. यासाठी कितीही दिवस या रस्त्यावर बसण्याची वेळ अाली तरी चालेल; पण अाता हटणार नसल्याचा इशारा प्रशासनाला दिला.

मोर्चाला मोठा प्रतिसाद
रविवारी झालेल्या ‘कासोधा’ परिषदेत या अांदोलनाची ठिणगी पडली होती. यशवंत सिन्हा यांनी मागण्या मान्य होईपर्यंत परत जाणार नसल्याचे सांगितल्याने अांदोलनाला बळ मिळाले. सोमवारी सकाळी गर्दी कमी होती. मात्र, मोर्चा सुरू झाला तेव्हा झालेली गर्दी पाहून सर्वच अवाक् झाले. शेतकरी हातात बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नष्ट झालेली कपाशीची झाडे उंचावून घोषणा देत होते. गर्दी अावरताना पोलिसांची पळापळ झाली. 

इतर अॅग्रो विशेष
अवजार उद्योगाला अर्थसंकल्पात प्रोत्साहन...अवजार क्षेत्राबाबत अनेक महिन्यांपासून शासन...
दुग्ध व्यवसायासाठी हवा स्वतंत्र निधीगेल्या वर्षभरात दूध व्यवसाय मोठ्या संकटाला तोंड...
‘पोल्ट्री’च्या वाढीसाठी हवे ठोस सरकारी...दुष्काळी भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना उद्योजकतेची...
पीकसंरक्षणातील खर्च कमी करायला हवायवतवाळ जिल्ह्यात कीडनाशक विषबाधेची जी गंभीर घटना...
राज्याचाही पिकांना दीडपट हमीभाव?मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील...
केवळ विदर्भातच थंडीपुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे....
शेतीमाल मूल्यसाखळी मजबुतीसाठी ठोस धोरण...शेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि...
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...