agriculture news in Marathi, Yashwant sinha says, fighting till fulfill demand, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमल होईपर्यंत लढा : यशवंत सिन्हा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील परिषदेनंतर झालेल्या आंदोलनाला शासनाने लेखी मान्य करीत तोडगा काढला. मात्र त्यानंतर अंमल केला नाही. अाता मागण्या मान्यच नाहीत, तर त्यावर अंमल सुरू होईपर्यंत अाम्ही थांबणार नाही, असा इशारा देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला. येथे मंगळवारी (ता. २३) अायोजित दुसऱ्या कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील परिषदेनंतर झालेल्या आंदोलनाला शासनाने लेखी मान्य करीत तोडगा काढला. मात्र त्यानंतर अंमल केला नाही. अाता मागण्या मान्यच नाहीत, तर त्यावर अंमल सुरू होईपर्यंत अाम्ही थांबणार नाही, असा इशारा देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला. येथे मंगळवारी (ता. २३) अायोजित दुसऱ्या कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

यशवंत सिन्हा यांनी गेल्या वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचा तो अानंद होता. मात्र जवळपास दहा महिने लोटले तरी त्यावर काहीही अंमलबजावणी झाली नाही. सरकारने फसविले. अाता हा लढा थांबणार नाही, असे सांगितले.
जागर मंचाने अायोजित केलेल्या या दुसऱ्या ‘कासोधा’ परिषदेला सिने अभिनेता तथा खासदार शत्रुघ्न सिन्हा, खासदार संजय सिंग, समाजवादी पक्षाचे नेता घनश्यान तिवारी, गुजरातचे माजीमंत्री प्रवीणसिंह जडेजा, अब्दुल फारुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शर्वरी तुपकर, अापच्या नेत्या प्रीती मेनन, अामदार अाशीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शत्रुघ्न सिन्हा यांनी शेतकऱ्यांनी अापल्या मागण्यांसाठी एकत्र येण्याचे अावाहन केले. 

खासदार सिंग म्हणाले, की २०१४ मध्ये देशाला मोदींनी अाणि राज्याला फडणवीस यांनी फसविले. यांनी अाश्वासन देऊनही स्वामिनाथन अायोग लागू केला नाही. शेतीमालाला भाव, थकलेले पैसे मागणाऱ्या शेतकऱ्यांवर मध्य प्रदेशात गोळीबार, तमिळनाडूत आंदोलन चिरडले तर दिल्लीत अहिंसादिनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. 

माजी मंत्री जडेजा यांनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना व अाता देशाचे पंतप्रधान असताना कसे खोटे बोलतात याबाबत सविस्तर सांगितले. आशीष देशमुख यांनीही सरकारवर हल्ला करीत केंद्र व राज्याने शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे सांगितले. प्रीती मेनन यांनी मुख्यमंत्री फडणवीस सरकार फसवे असल्याचे सांगत स्थानिक खासदार संजय धोत्रे यांच्यावरही टीका केली. खासदार असताना त्यांना राज्यमंत्री दर्जा देऊन सरकारने संविधानविरोधी काम केल्याचे म्हटले. शर्वरी तुपकर यांनी राज्यात शेतकरी अात्महत्या होत असून, सरकार सर्वच स्तरांवर अपयशी ठरल्याचे सांगितले. जागर मंचाचे संयोजक प्रशांत गावंडे यांनी परिषदेत ठराव वाचन केले. 

कासोधा परिषदेने मंजूर केलेले ठराव

  • सर्व शेतीमालासाठी भावंतर योजना तत्काळ लागू करावी.   
  • उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दुष्काळी अनुदान प्रतिहेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये वितरित करावे. 
  • सोनेतारण कर्जमाफीतील जाचक अटी दूर कराव्यात.  
  • सर्व शेतीमाल खरेदीसाठी एकराचा निकष दूर करून शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला सर्व शेतीमालविना अट खरेदी करावा
  • सर्व शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये प्रतिएकराप्रमाणे पीककर्ज देण्यात यावे
  • शेती अवजारे खरेदीसाठी चार टक्के दराने कर्ज व जीएसटी रद्द करावा  
  • वन्यप्राण्यांपासून शेतीला संरक्षण देऊन प्राण्यांना जंगलामध्ये नेण्याची व्यवस्था करावी
  • कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांवर निश्चित करणारे १२ ऑक्टोबर २०१७ चे शासन परिपत्रक मागे घ्यावे.  
  • अकोला जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यात यावे  पंदेकृविच्या ताब्यातील पडीक जमीन शेतकऱ्यांना द्यावी.

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...