यशवंत सिन्हा, तुपकर यांना अटक

यशवंत सिन्हा, तुपकर यांना अटक
यशवंत सिन्हा, तुपकर यांना अटक

अकोला : शेतकरी प्रश्नी काहीही तोडगा न निघाल्याने सोमवारी (ता. ४) माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकण्यासाठी सज्ज झाले होते. पोलिस बॅरिकेड्स अोलांडून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी सिन्हा, तुपकर व इतरांना अटक केली.

दुपारी चार वाजेनंतर जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय अांदोलकांना भेटण्यासाठी अाले. त्यांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र अांदोलकांचे समाधान झाले नाही. अंतिम तोडग्यासाठी जिल्हा प्रशासनाला काहीवेळ देण्यात अाला. परंतु पाच वाजेनंतर काहीही तोडगा न निघाल्याने सर्व शेतकरी यशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकण्यासाठी तयार झाले. पोलिस बॅरिकेड्स अोलांडून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी सिन्हा, तुपकर व इतरांना अटक केली. नेत्यांना अटक झाल्यानंतर उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी स्वतःला अटक करून घेतली. या वेळी एकच गोंधळ उडाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com