agriculture news in marathi, yashwant sugar factory issue, pune, maharashtra | Agrowon

‘यशवंत’चे धुराडे पेटविण्यासाठी अवसायकांची धडपड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

पुणे : गाळपासाठी पाच लाख टन ऊस उभा असलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला संजीवनी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यामुळे आता यशवंत कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी अवसायकांनी धडपड सुरू केली आहे. 

पुणे : गाळपासाठी पाच लाख टन ऊस उभा असलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला संजीवनी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यामुळे आता यशवंत कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी अवसायकांनी धडपड सुरू केली आहे. 

 हवेली तालुक्यातील थेऊर परिसरातील यशवंत कारखान्याचे धुराडे पेटल्यास अनेक गावांची आर्थिक सुबत्ता परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक शिस्त न पाळल्यामुळे २०११ मध्ये शेवटचा हंगाम घेत ‘यशवंत’चा बॉयलर थंडावला. त्यानंतर गेल्या सहा हंगामांपासून या कारखान्याचा बॉयलर पुन्हा पेटलेला नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘यशवंत’ सुरू करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठक घेतली होती. कारखान्याचा हंगाम सुरू करण्यासाठी तसेच थकीत देणी चुकती करण्यासाठी आराखडा तयार करा, अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या आहेत. 
 
‘यशवंत’ला सध्या कोणीही वाली नसल्यामुळे साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी आता या कारखान्यावर अवसायक म्हणून साखर सहसंचालक बी. जे. देशमुख यांची नियुक्ती केली आहे. श्री. देशमुख सध्या या कारखान्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी जोरदार नियोजन करीत आहेत.
कारखाना सुरू झाल्यास हवेली, वेल्हा, भोर, पुरंदर भागांतील हजारो शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो.  
 
‘यशवंत’च्या कार्यक्षेत्रात यंदाच्या गाळपासाठी पाच लाख टन ऊस उभा आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ७०० कामगारांचे संसार सांभाळत असलेल्या या कारखान्याकडे प्रतिदिन ३५०० टन गाळपाची क्षमता असलेली यंत्रणा आहे. ३० हजार लिटर्स क्षमतेची डिस्टलरी आहे. याशिवाय २४८ एकर जमीन आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...