agriculture news in marathi, yavatmal, maharashtra | Agrowon

वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे पथक यवतमाळमध्ये
विनोद इंगोले
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017
यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने जिल्ह्यातील २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर अनेकांना दृष्टिदोष झाला आहे. आजही अनेकांवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासकीय रुग्णालयात उपचार झाल्यानंतरही प्रकृती स्थिर असलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याची माहिती घेण्यासाठी मुंबई, नागपूर, चंद्रपूर व अकोला येथील पाच वैद्यकीय महाविद्यालयांतील पथक यवतमाळमध्ये रविवारी (ता.१५) दाखल झाले आहे.
 
यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने जिल्ह्यातील २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर अनेकांना दृष्टिदोष झाला आहे. आजही अनेकांवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासकीय रुग्णालयात उपचार झाल्यानंतरही प्रकृती स्थिर असलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याची माहिती घेण्यासाठी मुंबई, नागपूर, चंद्रपूर व अकोला येथील पाच वैद्यकीय महाविद्यालयांतील पथक यवतमाळमध्ये रविवारी (ता.१५) दाखल झाले आहे.
 
फवारणीतून विषबाधा झाल्याने आजपर्यंत २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सातशेवर रुग्ण बाधित झाले होते. त्या सर्व रुग्णांवर येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. दाखल झालेल्या रुग्णांपैकी अनेकांची प्रकृती स्थिर आहे. मात्र शुक्रवारी (ता.१३) व शनिवारी (ता. १४) दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णांची प्रकृती स्थिर होती. प्रकृती स्थिर असताना पहाटे आणखी एका शेतकऱ्याचे निधन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आली.
 
प्रकृती स्थिर असल्यानंतरही निधन झाल्याने डॉ. देशमुख यांनी मंत्रालयातील अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी इतर शासकीय महाविद्यालयतील डॉक्‍टरांचे पथक जिल्ह्यात माहिती घेण्याकरिता पाठविण्यात यावे, अशी मागणी केल्याची माहिती आहे.
 
जिल्हाधिकाऱ्यांची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केली असून, के.एम. मेडिकल कॉलेज, मुंबई, नायर मेडिकल कॉलेज मुबंई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, चंद्रपूर व अकोला या पाच ठिकाणच्या तज्ज्ञ डॉक्‍टराचे पथक यवतमाळमध्ये दाखल झाले.

 

फवारणीमुळे बाधित व मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता संबंधित सर्व विभागांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यात जिल्हाधिकारी स्वत: उपस्थित राहतात. याशिवाय निवासी उपजिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी आदी अनेक विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश असतो.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला...मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि...
सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेतीपारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा...
पुणे जिल्ह्यात टोमॅटो लागवडीस प्रारंभ पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी...
साताऱ्यात मेथी ५०० ते ७०० रुपये शेकडा सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...