परराज्यातील कीटकनाशकांची स्वस्तात विक्री
विनोद इंगोले
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

यवतमाळ जिल्ह्यात 32 कीटकनाशक कंपन्या व्यवसाय करीत आहेत. हंगामात यातील मोठ्या कंपन्यांचा 8 ते 10 कोटी रुपयांचा तर लहान कंपन्यांचा व्यवसाय 3 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगीतले जाते.

यवतमाळ : आंध प्रदेशच्या सीमेलगत यवतमाळ जिल्हा आहे. आंध्रप्रमाणे येथेही कापूस लागवडीचा पॅटर्न रुजला आहे. त्यापाठोपाठ कीटकनाशकेही आली. मोठ्या लाभासाठी बनावट कीटकनाशकांची विक्रीही सुरू झाली. नुकत्याच जिल्ह्यात झालेल्या विषबाधा प्रकरणात शेतकरी, शेतमजूर यांच्या मृत्युमागे आंध्र कनेक्‍शन असल्याचा दावा काही खासगी कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी करीत आहेत. परराज्यात बनावट कीटकनाशके तयार होतात. त्याची येथे स्वस्तात विक्री होत असून अशा बनावट कीटकनाशकांचा सुळसुळाट झाला असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

यवतमाळ जिल्ह्यात एकूण खरीप लागवड क्षेत्र सुमारे 9 लाख हेक्‍टर आहे. त्यातील सर्वाधिक 4 लाख 79 हजार हेक्‍टरवर यावर्षी कापसाची लागवड आहे. आंध प्रदेश सीमेलगत हा जिल्हा आहे. आंध्र प्रदेशमध्ये देखील कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होते. परिणामी यवतमाळ जिल्ह्यातदेखील कापूस लागवडीचा पॅटर्न रुजला.

एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 32 कीटकनाशक कंपन्या व्यवसाय करीत आहेत. हंगामात यातील मोठ्या कंपन्यांचा 8 ते 10 कोटी रुपयांचा तर लहान कंपन्यांचा व्यवसाय 3 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगीतले जाते. जिल्ह्यात वनस्पती वाढ नियंत्रकांची (पीजीआर)ची विक्री 35 ते 40 कोटी रुपयांची होते. किशोर तिवारी यांनी जिल्ह्यात 500 कोटी रुपयांच्या कीटकनाशकाच्या विक्रीचा दावा केला आहे.

आंध्र प्रदेशातून होते आयात
यवतमाळ कीडनाशकाची मोठी बाजारपेठ असल्याचे लक्षात आल्यावर आंध्र प्रदेशातील व्यावसायिकांनी याकडे लक्ष्य केंद्रित केले. खासगी कंपनी प्रतिनिधीच्या मतानुसार, आंध्र प्रदेशात कीटकनाशक 100-150 रुपये कमी दरात मिळतात. गुटूंर वगैरे भागात हा व्यवसाय होतो. चंदनखेडा (ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) येथील शेतकरी गाड्या करून जातात. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आंध्र प्रदेशातूनच हे शेतकरी कीटकनाशक आणतात. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पावले देखील गेल्या काही वर्षांपासून स्वस्तातील कीटकनाशक खरेदीसाठी आंध्राकडे वळू लागली आहेत.

व्यवहारात दस्तऐवज मिळत नाही
नांदेडमधील एक व्यावसायिक आंध्रातील कीडनाशक विक्री व्यवसायात मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यासंदर्भाने कोणतीही अधिकृत माहिती किंवा पुरावे नव्हते. आंध्र प्रदेशातून पुरवठा होणारी ही कीटकनाशक स्वस्तात विकली जातात. अशी कीटकनाशके तयार करताना फॉर्म्युलेशन योग्य होत नसावे, अशीदेखील शंका आहे. आंध्र प्रदेशातून येणाऱ्या या कीटकनाशकाच्या या व्यवहारात कोणतेच दस्तऐवज दिले जात नाहीत.

नियमित कीडनाशक नमुने घेतले जातात
अशाप्रकारचे गैरकायदेशीर व्यवहार झाले असल्यास त्याची वाच्यता कोणी करीत नाही. परंतु, ज्या शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू झाले. त्यांच्याकडे कीडनाशक खरेदीच्या रितसर पावत्या मिळाल्या आहेत. त्यामुळे या मृत्यूमागे बनावट कीटकनाशक आहेत असे म्हणणे संयुक्‍तिक ठरणार नाही. अशा प्रकारावर नियंत्रणासाठी आम्ही नियमित कीडनाशक नमुने घेण्याचे काम करतो. या वेळी 30 कीटकनाशकाचे नमुने पाच जिल्ह्यांत घेण्यात आले. त्यापैकी दहाचे अहवाल प्राप्त झाले असून ते पास झाले आहेत, असे डॉ. पंकज चेडे (विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक, अमरावती) यांनी स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...