agriculture news in marathi, Yavatmal poisoning case, SIT | Agrowon

"एसआयटी'ने घेतली बैठक; बाधितांची भेट
विनोद इंगोले
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

यवतमाळ : विषबाधा प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीने सोमवारी (ता. 30) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक व त्यानंतर रुग्णालयात बाधितांची भेट घेतली. अमरावती विभागीय आयुक्‍त पीयूष सिंग हे समितीचे अध्यक्ष आहेत.

यवतमाळ : विषबाधा प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीने सोमवारी (ता. 30) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक व त्यानंतर रुग्णालयात बाधितांची भेट घेतली. अमरावती विभागीय आयुक्‍त पीयूष सिंग हे समितीचे अध्यक्ष आहेत.

कीटकनाशकांची विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात 22 जणांचे बळी गेले होते. त्यासोबतच 560 पेक्षा अधिक विषबाधित झाले होते. या प्रकरणी अवर सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्राथमिक चौकशी केली. त्याआधारे दोषी आढळलेले कृषी विकास अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित आणखी काही दोषींवर कारवाईची शक्‍यता आहे. त्याकरिता शासनाने विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीने सोमवारी यवतमाळचा दौरा केला. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मॅरेथॉन बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, पोलिस अधीक्षक तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक, कृषी अधिकारी या बैठकीला होते.

बाधितांची घेतली भेट
सध्या शासकीय रुग्णालयात विषबाधित चार रुग्ण आहेत. त्यांची भेट चौकशी समितीने घेतली. रुग्णांकडून फवारणी करताना काय काळजी घेतली होती, औषधे कोणती होती, कीटकनाशकांचे मिश्रण करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले होते का? असे अनेक प्रश्‍न समिती सदस्यांनी विचारले.

इतर बातम्या
आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव...सोलापूर  : आषाढी सोहळ्यातील शासकीय...
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडतराहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या...
विमा तर उतरविला; पण पावती आली कोरीऔरंगाबाद : नावाला ऑनलाइन मात्र सारंच ऑफलाइन...
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
देशातील जलाशयांमध्ये ३२ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलशयांमध्ये...
तालुका कृषी कार्यालयाचा कारभार हाकतात...गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
आज आषाढी एकादशीपंढरपूर :  त्रिविध तापांची झाली बोळवण ।...
विदर्भात अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या...
शासकीय महापूजेला मुख्यमंत्री जाणार नाहीतपुणे - आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
सोलापूर जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत नाही सोलापूर  : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
पीकविम्यापासून ४५ हजार शेतकरी वंचित जळगाव : जिल्ह्यात मागील हंगामात राबविलेल्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...