यवतमाळ दुर्घटनेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी : मुख्यमंत्री
मारुती कंदले
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

ज्या कंपन्यांनी रासायनिक घटकांचे चुकीचे मिश्रण बनवले त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांनी विषारी  कीटकनाशकांची विक्री केली त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. त्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचा विचार आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई : यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधा दुर्घटनेची "एसआयटी' (विशेष तपासणी पथक) मार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.10) केली. दरम्यान, यवतमाळ येथील जिल्हा कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, की यवतमाळ दुर्घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. याप्रकरणी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी प्राथमिक चौकशी केली. हा चौकशी अहवाल राज्य सरकारला नुकताच मिळाला आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी कायदा बनवण्याचा विचार केला जाईल.

चायनीज गनच्या वापरामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे या गनवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात येईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
दुग्धव्यवसायाला दिशा देणारे मॉडर्न...आदर्श व्यवस्थापन (उदा. मुक्त गोठ), आधुनिक...
एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथआजच्या काळातील शेतीतील समस्या पाहिल्या तर...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...
बिगरनोंदणीकृत उत्पादने विक्रीवर बंदी...पुणे : कीटकनाशके कायद्यानुसार नोंदणी नसलेली...
महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल...बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या...
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...