agriculture news in marathi, Yavatmal's undercurrent situation is unrealistic | Agrowon

'यवतमाळची नजरअंदाजमधील पीक परिस्थिती अवास्तव'
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

राज्यातील सर्वच जिल्ह्यात पैसेवारी कमी काढू नये, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती आहे. हुकूमशाही धोरणाच्या बळावर दुष्काळ दडपण्याचे धोरण शासनाचे आहे. पावसाच्या खंडामुळे कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादकता फार येण्याची शक्यता नाही. तरीही नजरअंदाज पैसेवारी जादा काढून सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले जात आहे.
 - मनीष जाधव, शेतकरी, वागद, ता. महागाव, जि. यवतमाळ

यवतमाळ : खरिप हंगामात सप्टेंबर महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्याचा फटका मूग, उडीद व सोयाबीन पिकांना बसला असतानाच जिल्ह्याची नजरअंदाज आणेवारी ६५ पैसे जाहीर करण्यात आली आहे. सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर होणार असली, तरी नजरअंदाजमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत पीकपरिस्थिती चांगली दर्शविण्यात आली असून ती वास्तववादी नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.

जिल्ह्यात दोन हजार १५९ गावे आहेत. त्यातील दोन हजार ४८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. या गावांची पैसेवारी सोमवारी (ता.१) जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी मध्यंतरी पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे उडीद, मूग संकटात सापडले. पाऊस नसल्याने यंदा सोयाबिनच्या उत्पादनात ४० ते ५० टक्‍के घट होण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वी पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्याचाही फटका पिकांना बसण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीतही पैसेवारी ६५ आल्याने शेतकऱ्यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे.

उडीद, मूग, सोयाबीनच्या उत्पादनात घट, कापसावर बोंडअळीचे संकट, तर तूर हातात येईपर्यंत काय होते? या विवंचनेत शेतकरी आहेत.

तालुकानिहाय पैसेवारी

यवतमाळ ६३, कळंब ७२, बाभूळगाव ७३, आर्णी ६५,  दारव्हा ६०, दिग्रस ६१, नेर ६१, पुसद ६१, उमरखेड ६६,
महागाव ६२, केळापूर ६५, घाटंजी ६५, राळेगाव ७०,     वणी ६५, मारेगाव ६७, झरीजामणी ६२

 

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...